राम गणेश गडकरी यांचा मृत्युलेखआणि वास्तव
@लेखक-दिलीप गडकरी
याव्ज्जीवहि 'काय मी 'न कळले आप्तानप्रती नीटसें।
मित्रांतेहि कळे न गूढ-न कळे माझे मलाही तसे। ।
अज्ञाता ! मरणोत्तर प्रकट तें होईल तूंतें कसे॥
कोठे आणि कधी तरी जगतिं मी होऊन गेलों असे।।१ ।।
राम गणेश गडकरी यांनी १ एप्रिल १९१८ रोजी "माझा मृत्यूलेख" ही चार ओळींची कविता लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या .त्यापूर्वी थोडे दिवस त्यांनी कर्जत जिल्हा रायगड येथील "जीवन शिक्षण मंदिर" या शाळेला भेट दिली होती .त्यानंतर नऊ महिन्या नंतर २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचे सावनेर येथे निधन झाले . म्हणजे त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती असे वाटते .
त्यांनी अठरा नाटके , दोनशे पन्नास कविता , पंचवीस विनोदी लेख , दोन हजार पाचशे अभंग , चार कादंम्बऱ्या इत्यादी साहित्य निर्मितीचा संकल्प केला होता .परंतु त्यांचा संकल्प सिद्धीस जाण्यापूर्वीच परमेश्वरी इच्छेने त्यांच्या जीवन नाट्यावर अखेरचा पडदा पडदा पडला.
जास्त साहित्य निर्मिती झाली नाही तर आपल्या कार्याची कोठे नोंद होईल का ? याबाबत राम गणेश गडकरी यांना शंका होती .त्यांना अल्पायुष्य लाभले त्यामुळे अल्प साहित्य निर्मिती झाली त्यामुळे त्यांना फारशी अपेक्षा नव्हती फक्त आपण या जगात येउन गेलो याची कुठेतरी छोटीशी नोंद व्हावी असे त्यांना वाटत होते .
खरे म्हणजे हया शाळेला *राम गणेश गडकरी विद्यालय* असे नांव दिले असते तें योग्य ठरले असते . त्यासाठी मी अनेक वर्ष प्रयत्नं केले परंतु महाराष्ट्र शासनाने परवानगी नाकारली . परंतु माझ्या विनंतीस मान देऊन रायगड जिल्हा परिषदेने हया शाळेच्या दोन इमारतींच्या मध्ये सभागृह बांधून त्यास "*राम गणेश गडकरी सभागृह*" असे नांव दिले आहे . तीनशे माणसं बसतील इतके मोठे सभागृह असूनही तेथे जाण्यासाठी मार्ग केला , तेथे लाईट , पंखे , खुर्च्या इत्यादींची सोय केली तर छोट्या कार्यक्रमासाठी चांगली सोय होईल .
भर वस्तीत असलेल्या हया सभागृहाचा सर्व सामाजिक संस्थांनी नियमित वापर करावा व राम गणेश गडकरी यांची शेवटची इच्छा पुरी करण्यास मदत करावी ही अपेक्षा .