Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी व भावी डॉक्टरांसाठीआनंदाची बातमी

सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी व भावी डॉक्टरांसाठीआनंदाची बातमी 

मेडीकल कॉलेजचे काम लवकरच पूर्ण होणार

प्रतिक मिसाळ-सातारा



सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे व डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय काम आता अंतिम टप्प्यात आले आहे याबाबतची अत्यंत महत्वाची माहिती प्रशासनाने दिली आहे . मेडीकल कॉलेज तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सन २०२१ - २२ या वर्षा पासून एमबीबीएस जागांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संलग्नतेसाठी मान्यता दिली आहे . शासनाने आवश्यकता प्रमाणपत्रही दिले आहे . दि . २ डिसेंबर , २०२० रोजी नॅशनल मेडिकल आयोगा ( NMC ) कडे मान्यतेसाठीचा प्रस्ताव पाठविला आहे . सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जानेवारी २०२० पासूनच पूर्व तयारी सुरु करण्यात येणार असून सातारा येथील येथील स्व . क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ . संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे . 



डॉ गायकवाड हे पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसन रोग विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत . सातारा येथे नव्याने होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अपेक्षित असलेली जलसंपदा विभागाची कृष्णानगर येथील ६१ एकर २० गुंठे जागा सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे . वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दि .१५ जानेवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार सातारा येथील १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय इमारत व अनुषंगिक बांधकाम करणे यासाठी ४ ९ ५ कोटी ४६ लाख इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे . दरम्यान , गेली सात वर्षांपूर्वी सातारा आणि बारामती येथील मेडीकल कॉलेज एकाचवेळी मंजूर करण्यात आले होते . आज बारामती येथील मेडीकल कॉलेजची इमारत उभी हमेश प्रक्रिया ही सुरू झाली आहे . त्या तुलनेत आत्ताशी साताऱ्याच्यामेडीकल कॉलेजच्या प्रशासकीय कामांना गती मिळाली असून प्रत्यक्ष इमारत भूमिपूजन अन् विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी नागरिकांनी आमदार , खासदार यांच्याकडे पाठपुरावा करणे आवश्यक असणारं आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies