उक्रूल येथील हनुमान मंदिराची पुनर्बांधणी तथा प्रतिष्ठापणेचे कार्य संपन्न.
विकासाभिमुख सरपंचांचे ग्रामस्थांकडून कौतुक
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत तालुक्यातील साई मंदिर साठी फेमस असलेले उक्रूल हे गाव. तसेच गावातील ग्रामपंचायत सरपंच वंदना संतोष थोरवे यांच्या समाजाभिमुख कार्याने प्रसिद्ध आहे. याच दांपत्याने काही वर्षापूर्वी साई मंदिराचे सुशोभिकरण करण्याचे काम केले होते. आज पुन्हा एकदा ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने उक्रूल गावातील मंदिराच्या हनुमान मंदिराच्या पुनर्बांधणीचे व मूर्ती प्रतिष्ठापना चे काम केले . माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या कार्यातून उर्जा घेत तसेच विकासाची दिशा असलेले सुधाकर भाऊ घारे यांच्या पावलावर पाऊल टाकत संतोष थोरवे व वंदना थोरवे ग्रामपंचायतीसाठी सतत चौथ्यांदा निवडून दिलेले सरपंच आहेत . गावातील विकासाला प्राधान्य देत या अगोदर त्यांनी विविध कामे तत्परतेने केलेली आहेत. गावातील रस्ते रस्त्यालगत विजेची सोय पाण्याची सोय अशी अनेक कामे केलेली आहेत. या कामांना जोड म्हणूनच गावातील ग्रामस्थांनी आश्वासन पूर्वक घेतलेले वचन म्हणजेच हनुमान मंदिराचे पूर्ण प्रतिष्ठापना होय ते अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर सरपंच वंदना संतोष थोरवे यांनी वचनपूर्ती करत दिनांक 9 व 10 रोजी हनुमान मंदिराच्या पुनर प्रतिष्ठापना चे काम निर्विघ्नपणे केले. गावातील लोकांचा असलेला विश्वास हा त्यांना मागील दोन दशके सरपंच पदावर ठेवून विकास करून घेण्यासाठी फायद्याचा ठरला.
ठाणे जिल्ह्यातील वसई येथील असलेल्या वंदना ह्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने पुढे संतोष थोरवे यांच्या सोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेत गावाला विकासाची दिशा मिळवून दिली.म्हणूनच सतत 2 वेळा गावकऱ्यांनी त्यांना सदस्य व 2 वेळा सरपंच पदावर काम करण्यासाठी निवडून दिले. गावातील रस्ते , विजेची सोय त्यांनी यापूर्वीच केली असल्याने गावातील स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याकडे त्यांचं यापुढे लक्ष असून त्यासाठी निधीची तरतूद करत ते काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.
बांधलेल्या हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारचा विकास निधी न वापरता ग्रामस्थ व विकासक यांची मदत घेत ग्रामस्थांचे खुप वर्षांपासूनचे कलश मंदिराचे स्वप्न यावर्षी पूर्ण झाले आहे . ग्रामस्थांची आस्था असलेले मंदिर तयार झाल्याने त्यांनी लोकांची मने पुन्हा जिंकली असून लोक ही कामाने सुखावले आहेत. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार महेंद्र थोरवे तसेच क्रीडा आरोग्य आणि शिक्षण सभापती तथा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी क्रीडा आरोग्य आणि शिक्षण सभापती नरेश पाटील , यांनी भेट देत थोरवे दाम्पत्याचे कौतुक करत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शनिवारी सकाळी गणेशपूजनसह मंत्र घोष करण्यात आला. त्यानंतर उकरुल वारकरी मंडळाच्या वतीने दिंडी काढून नंतर जलाभिषेक सोहळा करण्यात आला. सायंकाळी हरिपाठ व रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी काकड आरती नंतर सौ. वंदना संतोष थोरवे व संतोष थोरवे यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. त्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून कलशारोहण व ध्वज रोहन करण्यात आला.
या कार्यासाठी अनेक विकासकांनी सढळ हस्ते मदत केली आहे त्यामध्ये उमरोली युवक काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष ऋषिकेश भगत, उद्योजक जनार्धन कोळंबे व सागर शेळके यांची नावे प्राधान्याने घेण्यात येतील असे संतोष थोरवे यांनी बोलताना सांगितले.
अप्रतिम कार्य काका आणि काकी आणि आपणस पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
ReplyDelete