हा ट्रेलर असून लढा अजून चालू झालेलाच नाही -- कोळसे पाटील - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

हा ट्रेलर असून लढा अजून चालू झालेलाच नाही -- कोळसे पाटील

 हा ट्रेलर असून लढा अजून चालू झालेलाच नाही -- कोळसे पाटील

 राजेश भिसे-नागोठणे



रिलायन्स किंवा अंबानींच्या नाही, तर व्यवस्थेच्या विरोधात लढत आहोत. संविधानाचे कलम १९ प्रमाणेच नागोठण्यातील हे आंदोलन चालू आहे. यश आता जवळ येत चालले आहे. जेल, पोलीस आणि मरणाला कधीच घाबरत नाही. हे ट्रेलर असून लढा अजून चालू झालेलाच नाही अशी स्पष्टोक्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सभेत केली. 

         २७ नोव्हेंबरला चालू झालेले रिलायन्सचे विरोधात चालू करण्यात करण्यात आलेल्या आंदोलनाला सोमवारी सायंकाळी ४६ व्या दिवशी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे पाटील यांनी सहाव्यांदा भेट दिली त्यावेळी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. संतोष म्हस्के, राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे, स्थानिक अध्यक्ष चेतन जाधव, मोहन पाटील, प्रबोधिनी कुथे, जगदीश वाघमारे, अनंत फसाळे, नारायण म्हात्रे यांचेसह इतर पदाधिकारी आणि हजारो आंदोलनकर्ते उपस्थित होते. ३६ वर्षे हा लढा चालू असला तरी, लोकशासनने दोन वर्षांपूर्वी हा प्रश्न हातात घेतल्यावर त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आले आहे. कंपनी आता आपल्याला काहीतरी द्यायला असून निघाली तुम्ही एकजूट करून येथे नसल्यामुळेच हे शक्य झाले आहे. नीती आणि सत्य कोणाला हरवू शकत नाही, हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नसल्याचे स्पष्ट करताना कोळसे पाटील यांनी स्थानिक खासदार सुनील तटकरे यांनी सुध्दा रिलायन्सकडून तुम्हाला काही तरी देण्यासाठी विशेष कष्ट घेतले असून त्यांचे आभार मानणे स्वतः चे कर्तव्य समजतो असे सांगितले. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी दीड महिना उलटूनही आंदोलनाच्या ठिकाणी आल्याच नसल्याने जिल्हाधिकारी, शासनाच्या आहेत की, अंबानींच्या ! असा सवाल त्यांनी आपल्या भाषणात केला. पूर्ण अभ्यास करूनच या आंदोलनात सहभागी झालो आहे. टप्प्याटप्प्याने मागण्या मान्य करण्याचे कंपनीने मान्य केले असले तरी, पूर्ण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उरलेले आयुष्य तुमच्यासाठीच घालवीत आहे व ते माझे कर्तव्य आहे. भांडवलदार तसेच राजकारणी मोठे पैसेवाले नसून पैशापेक्षा जनशक्तीच खऱ्या अर्थाने मोठी असल्याचे दिसून येत आहे.  जगातील सर्वात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन सध्या चालू आहे. 



मी स्वतः शेतकरी आहे व शेतमजूर म्हणून स्वतः काम सुद्धा केले आहे. आंदोलनात स्वतः सहभागी असून उद्या सकाळी पुन्हा दिल्लीत जात असून तेथील लढा यशस्वीपणे पूर्ण झाल्यावरच पुन्हा तुम्हाला भेटायला येईन, असे कोळसे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. या सभेत गंगाराम मिणमिणे, शशांक हिरे, राजेंद्र गायकवाड, अॅड. संतोष म्हस्के यांची मार्गदर्शनपर घणाघाती भाषणे झाली. सभेच्या शेवटी राष्ट्रीय संघटक, राजेंद्र गायकवाड यांनी पहिल्या टप्प्यात २२० प्रकल्पग्रस्तांचे नोकरीचे अर्ज आज सोमवारी रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांचेकडे पाठविण्यात आले आहेत. हे अर्ज छाननीसाठी करून रिलायन्स कंपनीत गेल्यावर पुढील अधिकृत प्रक्रिया पार पडल्यानंतरच आंदोलनाला स्थगिती देण्यात येईल अशी घोषणा केली. 


No comments:

Post a Comment