महाराष्ट्रात येणार देशातील पहिली जेल पर्यटनाची संकल्पना , येरवडा जेलमधुन होणार सुरुवात – अनिल देशमुख
मिलिंद लोहार-पुणे
भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या पुणे येथील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (२३ जानेवारी) नागपुरात दिली. देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जेल पर्यटनाची संकल्पना अंमलात आणण्यात येणार असुन येरवडा जेलमधून २६ जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे ,अशी माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.