Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

विकास कामात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठीमागे हिमालया सारखा उभा राहणार-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 विकास कामात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठीमागे हिमालया सारखा उभा राहणार-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


म्हसळा पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे नाव देण्यात येणार- खासदार सुनिल तटकरे 

अरुण जंगम-म्हसळा



महाराष्ट्र राज्याच्या सहकारी मंत्री,रायगड जिल्हा पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांना जिल्ह्यात तसेच श्रीवर्धन  मतदारसंघात लोकपयोगी विकास कामे करण्यास निधीची कमतरता पडु देणार नाही येथील विकासासाठी त्यांच्या पाठीमागे मी हिमालयासारखा उभा असेन अशी ग्वाही देतानाच आदरणीय नेते लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीला दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव देण्याची मागणी केली आहे त्याची पंचायत समितीचा प्रस्ताव लागलीच अंमलबजावणी करून मंजुरी दिली जाईल असे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी म्हसळा पंचायत समितीच्या इमारतीचे उदघाटन झाल्याचे घोषित करताना संबोधित केले.पंचायत राज 31 सहाय्यक अनुदाने 25/15 इतर ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठया थाटामाटात कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,उदघाटक राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना.हसन मुश्रीफ,पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमात प्रमुख अतिथी अलिशेट कौचाली,महमदभाई मेमन,तालुका अध्यक्ष समीर बनकर,राजीप कृषी सभापती बबन मनवे,महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,प्रांत अधिकारी अमित शेटगे,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,राजीप सदस्या धनश्री पाटील,सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,सदस्य संदीप चाचले,

नगराध्यक्षा जयश्री कापरे,माजी सभापती छाया म्हात्रे,माजी सभापती महादेव पाटील,अनिता खडस,नजीरशेट कादरी,माजी जिप सदस्या वैशाली सावंत,अंकुश खडस,व्यंकटेश सावंत,नाझीम हसवारे,उपनगराध्यक्ष सुहेब हळदे आदी मान्यवर तालुक्यातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमाला हसन मुश्रीफ यांनी अभ्यासु आणि मौलिक भाषण करताना कोविड 19 मुळे गेला वर्ष विकासाविना वाया गेला,व्यवसाय,व्यवहार पुर्णपणे थांबले त्यामुळे कर वसूली थांबली आणि राज्याचा अर्थ सहाय्य खोळंबला जो निधी गोळा होत होता त्यावर शासनाने आरोग्यासाठी आणि शासकीय पगारासाठी खर्च केला आहे आता हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे सांगताना नवीन शासकीय इमारतीत सर्वसामान्य माणसाला सेवा मिळायला हवी आम्ही मंजुर केलेल्या नवीन शासन योजनांचा लाभ देता येईल असे काम करावे असे सुचित करताना कोरोना कालावधीत लोकांची खरी सेवा शासन आणि शासकिय रुग्णालयांतील डॉक्टर,परिचारिका,वार्ड बॉय,अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी योद्धानी मेहनत घेतली त्या वेळी खासगी दवाखाने बंद होती याची आठवण करून देताना मोठया शहरातील धर्मादाय आयुक्तांचे आदेशानुसार सर्वच खासगी दवाखान्यात 10 % गरीब रुग्णांना त्या त्या आजारवर मोफत उपचार केलेच पाहिजेत असे ठणकावून सांगितले.सत्तेवर आणि विरोधात असतानाच मंत्री ना.मुश्रीफ यांनी किस्सा सांगत हशा पिकवताना मागील पाच वर्षे बीजेपी सरकार असताना आम्ही विरोधी बाकावर बसायचो,सभागृहात बोबंलायचो आणि जायचो या वेळी विधान सभेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळुन 161 आमदार निवडुन आल्याने या ही वेळी तेच काम करावे लागेल असे वाटत होते पण त्या वेळी दिवाळी होती अवेळी पाऊस पडत होता,खिडकी उघडली की पाऊस आणि टीव्ही उघडला की संजय राऊत (एकच हशा)त्यामुळे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांनी राज्याची सूत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली त्याला काँग्रेसनेही मान्यता दिली. हे सरकार पाच वर्षे टिकेल याची खात्री देताना नुकत्याच संपन्न झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीवरून सिध्द झाले असल्याचे आवर्जून सांगितले.म्हसळा तालुक्यासह संपुर्ण मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी मी  पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पाठीमागे हिमालयासारखा उभा असल्याचे पुन्हा नमूद करताना विकासासाठी काही नियोजन करावे लागेल ते आम्ही करू.निसर्ग चक्री वादळात या भागात अंगणवाडी इमारती, ग्रामपंचायत कार्यालय,रस्ते,आरोग्य सेवेसाठी जास्तीतजास्त निधीची उपलब्धता करेल असे आश्वाशीत करताना जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी कमीत कमी 20 नवीन रुग्णवाहिका मंजुर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे मुख्याधिकारी डॉ.पाटील यांना सुचित केले.महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब,सेनाप्रमुख हिंदु हृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीना उजाळा दिला व अभिवादन केले.



खासदार सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यातील ग्राम विकास मंत्री ना.हसन मुश्रीफ हे आघाडी सरकारमधील अभ्यासु,वजनदार आणि खास करून पवार साहेबांच्या मर्जीतील मंत्री आहेत.गरिबांना सेवा कशी द्यावी ह्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे त्यांच्या कडुन आमच्या मोठया अपेक्षा आहेत ना.मुश्रीफ यांनी गावांत रस्ते विकास करण्यासाठी तालुक्यातील एकुण लांबीच्या रस्त्यापेक्षा किमान दोन तीन किलोमीटरचा जास्तीचा निधी मंजूर करावा असे सुचित केले.कार्यक्रमाला उपस्थित आजी माजी पदाधिकारी यांना संबोधित करताना आपापसात मतभेद असु शकतात पण ते विकासाच्या आड येवु नयेत असे आवर्जुन सांगितले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी दिलेले प्रेम वाखाणण्याजोगे आहे त्या मुळे जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली.तत्कालीन वेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रायत्नाने मंजुर झालेल्या म्हसळा पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मागील आघाडी सरकारच्या काळात झाले होते काही कालावधी नंतर पुन्हा राज्यात आघाडी सरकार स्थापन झाले आणि  पुन्हा आम्हाला या इमारतीचा उदघाटन करण्याचा योगायोग आल्याची आठवण करून दिली.महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविण्यासाठी जिल्ह्यात जलजीवन कार्यक्रमांतर्गत 600 योजनांचे कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव ठेवले असल्याचे सांगितले.त्यांनी ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे आरोग्य सेवेसाठी 30 ते 35 रुग्णवाहिका,शासकीय इमारतीच्या दुरुस्ती करणे कामी निधी उपलब्ध करण्याची मागणी करताना कोरोना काळात रुग्णांना सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनिस सह सर्व शासकीय कर्मचारी वर्गाला धन्यवाद दिले.भव्यदिव्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  सभापती उज्वला सावंत यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies