पत्रकारांना धक्काबुक्की करणा-यांवर कारवाई व्हावी
मिलिंद लोहार - पुणे
पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभास व्यासपीठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ,पत्रकार फोटो जर्नालिस्टस व विडियो जर्नालिस्टस ना महापौरांच्या आदेशाने प्रवेश नाकारल्याने ,सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला ,हा निंदनीय प्रकार असून नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र याचा तीव्र निषेध करत आहे अशा शब्दात एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी टीका केली आहे.
झी २४ तास चे अरुण मेहत्रे , न्यूज 18 लोकमत वैभव सोनावणे , TV 9 च्या अभिजित पिसे ,अश्विनी सातव आदींना या धक्काबुक्कीचा फटका बसला . यावेळी या सर्वांनी महापौरांना प्रत्यक्ष भेटून आपण नवीन वर्षाचे आम्हास चांगले गिफ्ट दिले असे सांगत निषेध नोंदविला ...
*याप्रकरणी पुणे महापौरांनी माध्यमकर्मींना स्टेजमागे ठेवण्याचा आदेश का द्यावा,पत्रकारांची अडचण का व्हावी आणि अशा प्रकारे अपमानित का केले गेले याचे उत्तर महापौरांनी दिले पाहिजे.
आणि या कृतीस जबाबदार असलेल्यांनी माध्यमकर्मींची जाहीर माफी मागावी अशी मागणीही करदेकर यांनी केली आहे