उद्योजक संजय उतेकर यांची पोलादपूर कापडे विभाग संपर्क प्रमुखपदी नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

उद्योजक संजय उतेकर यांची पोलादपूर कापडे विभाग संपर्क प्रमुखपदी नियुक्ती

उद्योजक संजय उतेकर यांची पोलादपूर कापडे विभाग संपर्क प्रमुखपदी नियुक्ती

महाराष्ट्र मिरर टीम -पोलादपूरशिवसेना पोलादपूर तालुका कापडे विभाग संपर्क प्रमुख पदी शिवसेनेचे कट्टर समर्थक नवी मुंबईतील संजय विठू उतेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडीचे पत्र महाड-पोलादपूर-माणगावचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते एका कार्यक्रमात त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले.

यावेळी रायगड जि. प. चे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे, महाडचे संपर्क प्रमुख सुभाष पवार, पोलादपूर तालुका शिवसेना प्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख कृष्णा कदम, लक्ष्मण मोरे, पोलादपूर तालुका शहर प्रमुख सुरेश पवार, आणि तालुक्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

मुंबईत स्वकष्टाने उद्योजक बनलेल्या संजय उतेकर यांची तालुक्यातील एक सामाजिक भावनेने काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता अशीही ओळख आहे. विशेषतः तालुक्यातील वारकरी आणि ऐतिहासिक वारसा कसा जोपासला जाईल यासाठी ते सातत्याने सर्वोतोपरी मदत करीत असतात. समाजवादी विचारवंत माजी सभापती स्व कोंडीराम मास्तर उतेकर यांच्या राजकीय कारकीर्दीनंतर संजयरावांची राजकीय कारकीर्द या विभागात सुरु होत आहे.गेली ३० वर्षे संजय उतेकर हे मुंबई आणि पोलादपूर तालुक्यात शिवसेना पक्षाचे कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत.  या काळात महाड-पोलादपूरातील शिवसेनेच्या अनेक मान्यवर शिल्पकारांसोबत आणि ज्येष्ठांसोबत त्यांच्या  मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम केले आहे.  या नियुक्तीनंतर आमच्याशी बोलताना नवनिर्वाचित संजय उतेकर  म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही तालुक्यात शिवसेना पक्ष अधीक भक्कम झाला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाशी  एकनिष्ठ राहून वाडीवस्तीवरच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन युवकांच्या एकजुटीने तालुक्याच्या विकासाचे काम करूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचे  विकासाभिमुख नेतृत्व आगामी काळात अधिक भक्कम करूया.

यासाठी जो जो गाव आपल्यापासून दूर आहे तो येत्या सर्व निवडणुकांत आपल्या सोबत कसा असेल याची आखणी आपल्याला करावी लागेल.

यासाठी कापडे विभागात मी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे कार्यरत राहणार आहे.

No comments:

Post a Comment