Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खूप झाल्या विनवण्या, उपकार नको द्या मोबदला!

खूप झाल्या विनवण्या, उपकार नको द्या मोबदला!

नाहीतर उद्रेक आंदोलन

महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी आमदार तथा रायगड भाजप चे अध्यक्ष प्रशांत ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली येत्या २६ जानेवारी २०२१ रोजी दु. २.०० वाजता कर्जत तालुक्यातील रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे उद्रेक आंदोलन होणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील अन्यायग्रस शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झोपलेल्या रिलायन्स प्रशासनाला जागे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत यावेळी शेतक-यांनी दिली. यावेळी शेतक-यांसह कर्जत भाजप सरचिटणीस राजेश भगत, दिपक बेहरे, सरचिटणीस रायगड जिल्हा, रमेश मुंडे, भाजप चिटणीस रायगड, बंळवत घुमरे नगरसेवक उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापूर, गणेगाव, कडाव, कर्जत यासह ठाणे जिल्हयातील शेतक-यांनी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी उपोषण केले, अनेकवेळा पत्रव्यवहार केला. ज्या शेतक-यांना मोबदला मिळाला नाही त्यांना त्वरीत देण्यात यावा असे सक्षम प्राधिकारी यांनी आदेश दिले असतानाही रिलायन्सकडून अदयाप कुठलाच प्रतिसाद नाही. रिलायन्स आणि दलाल यांनी शेतक-यांची खुप मोठी फसवणुक केली असून प्रकल्पाचे काम पुर्ण होताच मोबदला देण्याबाबत टाळाटाळ सुरू आहे. अनेकवेळा बैठका झाल्या पंरतू निर्णय शुन्य अशी स्थिती असताना शेतक-यांनी अजून किती दिवस वाट पाहायची ? एकीकडे याप्रकल्पामुळे पिक घेता आले नाही तर दुसरीकडे निसर्गानेही शेतक-यांकडे पाठ फिरवत पिकांचे नुकसान केले अशा स्थितीत दिन दुबळ्या शेतक-यांने आपला उदरनिर्वाह तरी कसा करायचा हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.


भारतीय जनता पक्ष नेहमीच शेतक-यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला आहे. ज्यावेळी शेतक-यांवर अन्याय झाला त्यावेळी आम्ही शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलो आहोत. गेल्या वर्षभरापासून शेतक-यांसाठी मी या शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स तसेच सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. परंतू, रिलायन्स अथवा प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासीन असून हा विषय मार्गी लावण्यासाठी कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. म्हणून या झोपलेल्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी शेतक-यांना त्यांचा मोबदला त्वरीत देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन शेतक-यांसह करत असल्याचे आमदार प्रशांत ठाकुर यांनी सांगितले.  तसेच या जमिन अधिग्रहन करताना अनेक गैरव्यवहार झाले असून शेतकरी नसलेल्या किंवा ज्यांचा या प्रकल्पाशी दुरान्वये संबंध नाही अशा अनेकांना रिलायन्स आर्धिक लाभ दिला आणि ज्या गरीब शेतक-यांच्या या प्रकल्पात जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या त्यांना मात्र कवडीमोल मोबदला देत त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. खोटे पंचनामे, पेमेंट स्थगिती, पोलिसी बळाचा वापर करून जबरदस्ती पाईपलाईन टाकण्याचे काम रिलायन्सने केले आहे या सर्वांचा उद्रेक य़ा आंदोलनाच्या रूपाने दिसून येणार आहे. 


आमचा लढा कशासाठी ?


प्रकल्पात गेलेल्या आमच्या जमिनीच्या ७/१२ वरील नोंदीनुसार नुकसान भरपाईचा मोबदला त्वरीत मिळावा.

२०१८ पासून ते आतापर्यत पीक नुकसान भरपाई देण्यात यावी.  

कंपनीने शेतक-यांना कबूल केलेला मोबदला पुर्णपणे दयावा तसेच ज्या शेतक-यांना धनादेश देऊन नंतर ते थांबविण्यात आले त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

खोटे पंचनामे केलेल्या रिलायन्स अधिकारी आणि दलालांची गुन्हे अन्वेषण खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी.

मोबदला नाही तर आमच्या शेतात लाईनही नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies