Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

झोकून देऊन काम केल्यानेच_कोव्हीड योध्दासन्मान: आमदार महेश शिंदे

झोकून देऊन काम केल्यानेच_कोव्हीड योध्दासन्मान: आमदार महेश शिंदे

 प्रतीक मिसाळ-कोरेगांव  नुसती पोकळ चमकोगिरी न करता कोरोनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी झोकून देऊन काम केल्यानेच कोव्हीड योध्दा सन्मान होतो , हे कोरेगांवकरांनी दाखवून दिल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले . शहरातील प्रभाग 7,8 व 9 मधील कोरोना योध्यांचा सन्मान येथील श्री भैरवनाथ सभागृहात पार पडला , त्यावेळी आमदार महेश शिंदे बोलत होते . नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , नगरसेविका शुभांगी बर्गे , माजी उपसरपंच राहुल बर्गे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमास नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे , माजी उपसभापती उदयसिंह बर्गे , अॅड . चंद्रशेखर बर्गे , फत्तेसिंह बर्गे , युवक अध्यक्ष राहुल बर्गे , प्रा . अनिल बोधे , नगरसेवक सुनिल बर्गे , राजेंद्र बर्गे , प्रतापराव मोहिते , सुनिल निदान , उज्वलाताई निकम , सुषमा निकम , श्रीकांत बर्गे , अजय बर्गे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले , सुरुवातीच्या काळात कोरोना नियंत्रीत आणण्याचे नियोजन केले , बाहेरुन येणाऱ्या लोकांना विश्वास देऊन त्यांचे विलगीकरण केले , ऑगस्टमध्ये उसळलेल्या अतिरीक्त रुग्णसंख्येवर मात करण्यासाठी स्वतखर्चातून 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभे केले , अवघ्या काही दिवसात कोट्यावधी रुपयांची खर्चीक यंत्रणा या रुग्णालयात उभी केली . समोर निष्पापांचे मृत्यू दिसत असताना सुध्दा जीवावर उदार होवून इथल्या जनतेसाठी झुंज देण्याच्या निर्धाराने माझ्यासह माझे सर्व कुटुंबिय , मित्र , सहकारी , कोरेगांव मधील व्यवसायीक , अनेक घटक यासह काही नगरसेवक यांनी याकामात मोठे योगदान दिले . केवळ प्रसिध्दी न करता प्रत्यक्ष रुग्णांना मदत दिल्यानेच शेकडो लोकांचे प्राण वाचवू शकलो . अगदी घरच्या माणसांप्रमाणेच प्रत्येक रुग्णाची सेवा केल्यानेच आम्ही कोरोनावर नियंत्रण आणण्यात यशस्वी ठरल्याचे सांगून आमदार महेश शिंदे म्हणाले , दररोज किती खर्च होतोय याची तसूरभर चिंता सुध्दा माझ्या सहकाऱ्यांमुळे आली नाही , त्यामुळे हे कोव्हीड सेंटर महाराष्ट्रात अभिमानाने पुढे आले , झोकून देऊन काम केल्यानेच तुमच्या बरोबरीने मला सुध्दा कोव्हीड योध्दा सन्मान स्विकारताना आनंद होत असून आता एवढ्यावर थांबून चालणार नाही , येणाऱ्या काळात अशी सगळी आव्हाने परतवून लावण्यासाठी आजच्या सारखी एकजुट आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले . कोरेगांव शहरात मुख्याधिकारी , नगरसेवक , कर्मचारी , युवा कार्यकर्ते , सामाजिक संस्था , आशा सेविका , अंगणवाडी सेविका यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने केलेले काम निश्चितच प्रेरणादायी ठरले . तुम्ही सर्वांनी केलेल्या कामामुळेच आपला मतदारसंघ कोरोनावर मात करण्यात निर्धाराने पुढे आला असून आपल्या कामाचा हा गौरव रास्त असल्याचेही ते म्हणाले . प्रारंभी शहरातील 50 व्यक्तींचा तसेच नगरपंचायत , आरोग्य विभाग , सोनेरी ग्रुप , संस्कृती प्रतिष्ठान , कोरेगांव विकास मंच या सामाजिक संस्थाचा कोव्हीड योध्दा सन्मानाने गौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष नलावडे यांनी केले , तर उपस्थितांचे स्वागत माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , नगरसेविका शुभांगी बर्गे , श्रीकांत बर्गे , सागर दोशी यांनी केले . माजी उपसरपंच राहुल बर्गे यांनी उपस्थितांचे आभार मानले . कार्यक्रमास चंद्रकांत बर्गे , पोलीस पाटील दिपक शिंदे , बाळासाहेब बर्गे , डॉ . राजन काळोखे , डॉ . विनोद म्हसकर , डॉ . दिपक बनसोड , किशोर बर्गे , राजेश दायमा , महालिंग जंगम , अजित पवार , सुधाकर बर्गे , निवृत्ती सुतार , पांडुरंग सुतार , बाळासाहेब सावंत , सुनील पवार , नाना शिंदे , प्रभाकर महाजन , हर्षल जोशी , अक्षय पवार आदींसह नागरिक उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies