लिंगायत धर्म बचाव समितीच्या वतीने दिनदर्शिका वाटप
सुधीर पाटील सांगली
निमणी येथे लिंगायत धर्म बचाव समितीच्या वतीने दिनदर्शिका वाटप करण्यात आली यावेळी लिंगायत धर्म बचाव समितीचे जिल्हा अध्यक्ष भक्तराज ठिगळे म्हणाले लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वर महाराजांनी केली लिंगायत धर्मातील सर्व पोटजाती मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळाव्यात देशांमध्ये दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये लिंगायत धर्म व त्यातील पोट जातींची जनगणना जशी इंग्रज आणि सन 1853 पासून 1931 पर्यंत केली शासनाने येणाऱ्या सन2021 मध्ये लिंगायत धर्मातील पोट जातीची जनगणना वेगवेगळ्या प्रकारे करण्यात यावी लिंगायत धर्माला जोपर्यंत अल्पसंख्यांक दर्जा मिळणार नाही तोपर्यंतलिंगायत धर्मातील पोट जातीतील बांधवांनी लढणे ही काळाची गरज आहे . त्याच बरोबर जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावयास लावण्यासाठी शासनास भाग पाडणे लिंगायत धर्मातील वाणी ,तेली ,माळी ,साळी ,कोळी ,कोष्टी ,कुंभार ,सुतार ,ढोर ,चांभार ,परीट ,लोहार, सर्व पोट जातीतील लोकांनी आपल्या धर्माला मान्यता मिळवण्यासाठी एकत्र यावे लिंगायत धर्म बचाव समितीचे जिल्हाध्यक्ष भक्तराज यांनी केले. यावेळी निमणी गावचे सरपंच विजय पाटील ,आर .डी .पाटील डी. ऐ . पाटील ,नामदेव जमदाडे ,दशरथ पाटील ,शिवलिंग स्वामी ,आदी मान्यवर उपस्थित होते,