मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा ज्युपिटर हॉस्पिटल,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र मिरर टीम-ठाणे ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री  मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत दादा शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा जूपिटर हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लहान मुलांसाठी मोफत हृदयाची 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

हे एक दिवसीय महाआरोग्य शिबिर येत्या रविवारी दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4  या वेळेत ज्युपिटर हॉस्पिटल,ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे. या शिबिराअंतर्गत सर्व लहान मुलांची वयोगट( 0 ते 16) मोफत 2 डी इको कार्डिओलॉजी तपासणी, मोफत कार्डिॲक सर्जरी कन्सल्टेशन, जन्मतः हृदयाला छिद्र असणाऱ्या मुलांची मोफत शस्त्रक्रिया राज्य शासनाच्या विविध योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. तसेच गरजू निर्धन रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी , सिद्धिविनायक ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

 तरी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि जवळपासच्या सर्व नागरिकांनी एक दिवसीय विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि जूपिटर हॉस्पिटल, ठाणे यांनी केले आहे. वेळेअभावी नोंदणी न करू शकल्यास थेट शिबीर स्थळी केसपेपर काढून तपासणी करता येईल, अशी माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी

मंगेश चिवटे( मो.9665951515)

कक्षप्रमुख

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय 0222532567 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment