सातारा एसटी बस स्थानक येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगरचा फलक लावून मनसेचे आक्रमक आंदोलन
प्रतिक मिसाळ -सातारा
गेल्या ३२ वर्षांपासून सत्ताधारी शिवसेनेने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आम्ही करू या एकाच मुद्दयावर संभाजीनगर च्या जनतेसोबत कायम भावनिक राजकारण करून जनतेचा विश्वासघात करून सत्ता मिळवली , आज सेनेचे मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे असून देखील सुद्धा छत्रपती संभाजीनगर हे नामांकरण करू शकत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे मनसे ने हा मुद्दा आक्रमक पणे हाती घेतला आणि आज साताऱ्यात याचे मुख्य बस स्थानकात पडसाद उमटले व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले , यावेळी सातारा एसटी डेपोतून औरंगाबाद कडे जाणाऱ्या प्रत्येक एसटी वर छत्रपती संभाजीनगर हा फलक लावूनच रवाना करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो फलक लावून एसटी बसेस रवाना करेल असा आक्रमक पवित्रा शहर अध्यक्ष राहुल पवार यांनी घेतला ,
तसेच औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व्हावे हे शिवसेना प्रमुख वंदनीय मा . बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते , गेली अनेक वर्षे मनपा मध्ये सेनेची सत्ता असून , आज मुख्यमंत्री सेनेचा असून , नामांतराचे विधेयक पारित केले होते असे असून देखील या नामांकरणाला वेळ का लागत आहे यासाठी आज मनसे ने आरपार ची लढाई रस्त्यावर उतरून लढायला सुरुवात केली आहे आणि मनसेच छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण करणार अशी आक्रमक भूमिका जिल्हा सचिव श्री राजेंद्र केंजळे यांनी घेतली ....