Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुरबाड तालुक्याच्या 71 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

 मुरबाड तालुक्याच्या 71 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

सुधाकर वाघ-मुरबाडमुरबाड तालुक्यातील 15 जानेवारीला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे सरपंच आरक्षण आज दिनांक 3 फेब्रवारी रोजी मुरबाड औद्योगिक वसाहत सभागृहात तहसिलदार अमोल कदम यांचे उपस्थितीत काढण्यात आले . एकूण 44 ग्रामपंचायतीची ही सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली . यावेळी एका लहान मुलीच्या हस्ते चिट्या काढून प्रक्रिया पार पाडली होती.

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ मुरबाड तालुक्यातील 126 ग्रामपंचायत पैकी 44 ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्या नंतर 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या .तर 39 ग्रामपंचायतीत निवडणुक पार पडल्या होत्या . यात देखील काही जागा बिनविरोध झालेल्या होत्या. तर आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत तहसिलदार यांचे उपस्थितीत व एक लहान मुलीच्या हस्ते चिट्या टाकून काढण्यात आले . यातील शिवळे , खांडपे , उचले या तीन ठिकाणी अनु .जातीचे आरक्षण पडले आहे. तर मासले ,आसोसे , खानिवरे या तीन ठिकाणी अनु.जमाती तर नढई , मोहप , शेलारी, कोरावळे , माजगांव , कान्होळ , कान्हार्ले , जांभुर्डे , पाटगांव , कोलठण या दहा ठिकाणी इतरमागास महिला, 9 ठिकाणी इतरमागास तर उर्वरीत ग्रामपंचायत या सर्वसाधारण महिला​ व पुरुष या करीता राहीलेल्या आहेत . आजची आरक्षण सोडत ही 71 ग्रामपंचायती करीता काढण्यात आली असून , 27 ग्रामपंचायतींची निवडणुकीची मुदत पुढील काळात संपणार आहे . सरपंच निवड थोड्याच दिवसात होणार असून , त्यानंतर सरपंच कोणत्या पक्षाचा हे ठरणार . आजच्या आरक्षण सोडतीने अनेक इच्छुकांची निराशा झाल्याचे दिसुन आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies