चावणी उंबरखिंडीत ३६० वा विजय दिन साजरा,विविध मान्यवरांची उपस्थिती....
दत्तात्रय शेडगे-खालापूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चावनी समरभूमी उंबरखिंडित आज ३६० वा विजय दिन साजरा करण्यात आला .
सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व महिला सरदार रायबाधन यांच्या 30 हजार फौजेवर समरभुमी उंबरखिंड येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी ज्या 27 महत्वपुर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी ही एक लढाई म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे दरवर्षी चावनी (छावणी )येथे ग्राम पंचायत चावणी व ग्रामस्थ चावणी, पंचायत समिती खालापूर, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या वतीने या वर्षी ३६० वा विजयदिन सोहळा समरभुमी उंबरखिंड छावणी येथे आयोजित करण्यात आला होता.
शिस्त बद्ध आणि पारंपारिक खेळा बरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. शाळेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा दिला त्याच बरोबर पोवाडा, मर्दानी लाठीकाठी खेळाचे प्रात्यक्षिके तसेच देशभक्ती आणि शिव व्याख्याते विवेक परशुराम भोपी यांनी उंबरखिंड च्या इतिहासासमवेत छत्रपती शिवरायांची दुरदृष्ठी आणी पारदर्शक राजा म्हणून त्यांच्या कार्याला उजाळा दिला असून मराठमोळा पोवाडा व स्फुर्ती गीतांचा प्रबोधनपर शाहीरी रायगड भुषण शिवशाहीर वैभव घरत यांनी सादर केले असून यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विजय स्तभांचे पुजन करून श्रीफळ वाढवून छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत नेताजी पालकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराज्यांनी कारतलब खान आणि सरनौबत नेताजी पालकर यांनी आपल्या मूठभर मावळ्यांसह तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे दारुण पराभव केला याचे स्मरण व्हावे आणि कार्यास उजाळा मिळावा यासाठी दरवर्षी चावनी समारभूमी उंबरखिंड येथे विजयदिन साजरा करण्यात येतो
यावेळी या क रा.जि.प.सदस्य नरेश पाटील, खालापूर पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, माजी सभापती तथा विदयमान सदस्य श्रध्दा साखरे, सदस्य उत्तम परबळकर, गटविकास अधिकारी संजय भोये, स हाय्यक गट विकास अधिकारी खालापूर पोल, विस्तार अधिकारी तांडेल, अँड.राजेंद्र येरुणकर, सामाजिक कार्यकर्ते मनिष खवळे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, माजी रा.जि.प.सदस्य शशी देशमुख, महिला आघाडी संघटक रेश्मा आंग्रे, चावणी सरपंच मनिषा निरगुडे, उपसरपंच बाळू आखाडे, ग्रामसेवक प्रल्हाद पाटील, सद्स्य अमोल कोंडभर, चिंदूताई चव्हाण, गिता वाघमारे, संजना डफाल, आत्करगांव सदस्य समीर देशमुख, शिवव्याख्याते विवेक भोपी, शिवशाहिर वैभव घरत, शिवदुर्ग मंडळ अध्यक्ष सुनिल गायकवाड, आकाश घरटे, चावणी माजी उपसरपंच गणेश चव्हाण, हनुमंत पाटील, पोलीस पाटीस समीर पाटील, ग्रामस्थ बाळू बुधलेकर, गणपत चव्हाण, रमेश चव्हाण, जयंता भऊड, गावधनवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ साळुंखे, शशिकांत पाटिल आदिसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.