यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसिलदार श्री. वैभव पवार यांच्यावर रेती माफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. शासकीय कर्तव्य करीत असताना राजपत्रित अधिकाऱ्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या या अत्यंत भ्याड, निर्दयी व जीवघेण्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने तीव्र निषेध नोंदविला आहे. हा निषेध नोंदविताना आज जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांना लेखी निवेदन दिले तसेच महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेकडून सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, गमन गावित, श्री.रायन्नावार, श्रीम.अरुणा जाधव, कविता जाधव आदी उपस्थित होते.