बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीस २० वर्षे सक्तमजूरी व ५००० रुपये दंडाची शिक्षा
प्रतीक मिसाळ-सातारा
दि .२४ / ०६ / २०१८ रोजी शहापूर ता.जि.सातारा गावचे हद्दीत पिडीत यांच्या घरामध्ये आरोपी नंदन बापू अडागळे वय ४६ वर्षे रा.शहापूर ता.जि.सातारा याने पिडीत यांच्या घरामध्ये येवून त्यांचे इच्छेविरुध्द जबरदस्ती करुन बलात्कार केल्याने फिर्यादी यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं .३५२ / २०१७ भादविक ३७६ , ३७६ ( १ ) , पोक्सो ३ ( ब ) ( क ) सह ४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता . पोलीस उपनिरीक्षक श्री.व्ही.एस.चव्हाण व महिला पोलीस उपनिरीक्षक ए.बी.दयाळ यांनी नमुद गुन्हयाचा उत्कृष्ठ तपास करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावा प्राप्त करुन मुदतीत मा.न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते . नमुद खटल्याची सुनावणी मा.श्री.पटणी जादा सह जिल्हा न्यायाधिश , सातारा यांचे न्यालायामध्ये झाली असून दि .०१ / ०२ / २०२१ रोजी मा.न्यायालयाने आरोपी नंदन बापू अडागळे वय ४६ वर्षे रा.शहापूर ता.जि.सातारा यास २० वर्षे सक्त मजूरी , ५००० रुपये दंड , दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे . नमुद खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून अँड.एन.डी.मुके , ॲड.ए.एस.घारगे यांनी काम पाहिले असून त्यांना पैरवी अधिकारी म.पो.ना.शुंभागी भोसले यांनी मदत केली आहे . श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक , सातारा व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक , सातारा यांनी तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक श्री.व्ही.एस.चव्हाण व महिला पोलीस उपनिरीक्षक ए.बी.दयाळ , पैरवी अधिकारी म.पो.ना.शुंभागी भोसले तसेच तपास पथकातील सर्व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे .