आदेश बांदेकर यांची माथेरानचे "पर्यटन राजदूत" म्हणून निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, February 26, 2021

आदेश बांदेकर यांची माथेरानचे "पर्यटन राजदूत" म्हणून निवड

 आदेश बांदेकर यांची माथेरानचे "पर्यटन राजदूत" म्हणून निवड

चंद्रकांत सुतार --माथेरान माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्व साधारण सभेत आदेश बांदेकर याची माथेरान पर्यटन वाढीसाठी  माथेरानचे  पर्यटन राजदूत (Tourism Ambassador) म्हणून निवड करण्यात आली .

 सुप्रसिद्ध  दिग्दर्शक, झी मराठीच्या होम मिनिस्टर  या कार्यक्रमातुन संपूर्ण  महाराष्ट्राचे, देशाचे लाडके भावोजी म्हणून नावलौकिक मिळविलेले,  शिवसेना  सचिव, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा  माजी संपर्क  प्रमुख आदेश बांदेकर यांची माथेरानचे  पर्यटन राजदूत  म्हणून निवड केल्याने  येथील पर्यटन  वाढीस मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे, नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या हस्ते  आदेश बांदेकर यांना  माथेरान पर्यटन राजदूत निवडीचे  पत्र देऊन , माथेरान नगर परिषदेच्या वतीने  त्याचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते, तथा बांधकाम सभापती, प्रसाद सावंत, मुख्याधिकारी प्रशांत जाधव,, नगर सेवक राजेंद्र शिंदे, संदीप कदम,चंद्रकांत जाधव, नगरसेविका  कीर्ती मोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी,  रत्नदीप प्रधान,  रणजित कांबळे, स्वागत बिरंबोळे, अंकुश इचके, राजेश रांजणे, प्रवीण सुर्वे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते,

No comments:

Post a Comment