लोणेरे येथे जय मल्हार क्रिकेट चषकाचे भव्य आयोजन.
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
लोणेरे जय मल्हार क्रिकेट क्लब आयोजित दिनांक १९,२०,२१ फेब्रुवारी रोजी भव्य ओव्हरआर्म स्पर्धेचे आयोजन डॅा. बाबासाहेब आंबेडकर तंन्त्रशास्त्र विद्यापीठाच्या मैदानावर शिवजयंतीच्या मुहूर्तावर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भव्य शाही दिमाखदार सोहळा साजरा करून उद्घाटन समारंभ शिवसेनेचे मा. जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
टेनिस
क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात भव्य दिव्य अश्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन होताना नेहमीच दिसत असते. कदाचित त्यामुळेच आज रायगड जिल्ह्यातील काही नामांकीत टेनिस क्रिकेट खेळाडू आपलं नाव सबंध देशात गाजवत असल्याचे आपल्याला पहावयास मिळत असते. तोच मानस पुढे नेत माणगाव तालुक्यांतील लोणेरे येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर तंन्त्रशास्त्र विद्यापीठ मैदानावर दिनांक १९,२० व २१ फेब्रुवारी रोजी भव्य सामने आयोजित केले असून प्रथम क्रमांक ३०,०००, द्वितीय क्रमांक २०,०००, तृतीय क्रमांक १०,०००, चतुर्थ क्रमांक ५००० व भव्य चषकाचे आयोजन केले आहे.
यावेळी उपस्थित पंचायत समिती सभापती महेंन्द्र तेटगुरे, मुकुंन्दजी जांभरे,लोणेरे नवनिर्वाचित सरपंच रवींन्द्र टेंबे, गजानन डवले, समीर टेंबे,चंन्द्रकांत केसरकर, समाधान करकरे, अनिकेत घोसाळकर व उपस्थित खेळाडू, जय मल्हार संघाचे सभासद.