मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यक्रम मंडपाचा आज शुभारंभ. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यक्रम मंडपाचा आज शुभारंभ.

 मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यक्रम मंडपाचा आज शुभारंभ.

महाराष्ट्र मिरर टीम-उस्मानाबादमध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मंडप भूमिपूजनाचे 

आज नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी व नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांनी उपस्थित समिती मधील सर्वाना समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त शहरवासीयांचे सहभाग नोंदवून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. एकीकडे वर्षभर कोरोनाचे थैमान होते, त्यातून आता आपण सर्वजण मोकळे होण्यासाठी कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महानाट्य साठी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले.यावेळी उपस्थित 

मध्यवर्ती शिवजयंतीचे अध्यक्ष आशिष मोदानी, प्रशांत पाटील कार्याध्यक्ष राम मुंडे, उपाध्यक्ष सुरज शेरकर, संघटक विशाल पाटील, महेश पोतदार ,धीरज वीर, अग्निवेश शिंदे ,रवींद्र केसकर ,रोहित बागल, मदन कुलकर्णी, उल्हास गपाट, राज ढवळे, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अभिजित देडे,सौरभ गायकवाड, सोशल मिडिया प्रमुख प्रसाद राजमाने,सादिक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment