Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोविड फायटर क्रिकेट लीग पोलीस संघ विजेता; पत्रकारांकडे उपविजेतेपद

           कोविड फायटर क्रिकेट लीग

पोलीस संघ विजेता; पत्रकारांकडे उपविजेतेपद

पोलीस संघाचा अष्टपैलू नंदू कांबळी ठरला मालिकावीर

ओंकार रेळेकर-चिपळूण



नाटक कंपनीचे चिपळूण आयोजित 'कोविड फायटर क्रिकेट लीग' सोमवारी पवन तलाव मैदानावर रंगली. कोविड फायटर म्हणून काम करणाऱ्या विविध शासकीय विभागातील आठ संघ यांच्यात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात चिपळूण पोलीस संघाने चिपळूण पत्रकार संघावर मात करीत फायटर क्रिकेट लीगचे विजेतेपद पटकावले, लक्षवेधी कामगिरी करीत पत्रकार संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. तसेच चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही मैदानावर उतरून कोविड फायटरना सलाम केला. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे याच्या हस्ते विजेत्या संघाला गौरवण्यात आले. गौरव मोरे यांनी आपल्या खास शैलीत 'आय एम गौरव मोरे फ्रॉम... पवई फिल्टरपाडा' असे म्हणत उपस्थितांची मने जिंकली. 

स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, डीवायएसपी सचिन बारी, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई चव्हाण, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, सामाजिक कार्यकर्ते नाझीम अफवारे यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर डॉक्टर व पत्रकार यांच्यात सलामीचा सामना झाला. या स्पर्धेत एकूण आठ निमंत्रित संघ सहभागी झाले होते. पोलीस, पत्रकार, डॉक्टर, महावितरण, लोकप्रतिनिधी, कलाकार, नगरपरिषद, महसूल अशा आठ संघात ही स्पर्धा रंगली. 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राची हास्यजत्रा गौरव मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे, सामाजिक कार्यकर्ते नासिरभाई खोत, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाबू तांबे, युवा नेते अनिरुद्ध निकम, अभिनेत्री गौरी फणसे, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले, एपीआय विक्रम पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, डॉ. संतोष दाभोळकर, नगरसेवक आशिष खातू, रसिका देवळेकर, संगीता रानडे आदी उपस्थित होते. मॅन ऑफ द सिरीजचा मान पोलीस संघाच्या नंदू कांबळी यांनी पटकावला तर उत्कृष्ट गोलंदाज पोलीस संघाचे एपीआय सागर चव्हाण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पत्रकार संघाचे महेंद्र सुर्वे व फलंदाज म्हणून सुशांत कांबळे यांना गौरविण्यात आले. 

या स्पर्धेला प्रगतशील शेतकरी वसंत उदेग, नगरसेवक विजय चितळे, मनोज शिंदे, वैशाली शिंदे, राजन इंदुलकर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. नगरसेवक उमेश सकपाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विकी नरळकर, महसूल विभागातील प्रकाश सावंत यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी-कर्मचारी हे मैदानावर खेळासाठी उतरले होते. 

या स्पर्धेसाठी मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीचे लेखक ऋषिकेश कोळी, अभिनेते गौरव मोरे, 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम मिहीर राजदा, 'एक टप्पा आऊट'मधील केतन साळवी, विनोदवीर मंदार मांडवकर, 'महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम' निखील बने असे कलाकारही या स्पर्धेसाठी खास उपस्थित होते. स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे आणि अनिरुद्ध निकम यांनी नाटक कंपनीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. नाटक कंपनीने मैदानावरही महत्त्वाचे आठ शासकीय विभाग उतरवून कोविड फायटरना अनोखी सलामी दिली व अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, असे नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे म्हणाल्या. अभिनेता गौरव मोरे यांनी आपण नाटक कंपनीने आयोजित केलेली ही कोविड फायटर क्रिकेट लिग पाहून भारावलो आहोत, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून पवईमध्येही अशा पद्धतीने कोविड फायटर क्रिकेट लिग आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असे टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. बक्षीस समारंभादरम्यान बालकलाकार रसिका जोशी हिने संकर्षण कराडे यांची 'विठ्ठला'वरील कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे समालोचन प्रसिद्ध समालोचक बाबल्या जाधव व हिंदीतील समालोचक इब्राहिम सरगुरोह यांनी केले. 

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नाटक कंपनीचे अभिनेते ओंकार भोजने, योगेश बांडागळे, दिलीप आंब्रे, सावरी शिंदे, जान्हवी तांबट, रसिका जोशी, आदेश कांबळी, श्रवण चव्हाण, प्रशांत कदम, साहिल दाभोळकर, आकाश मोहिते आदींनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, आमदार शेखर निकम, अतिथी हॉटेलचे प्रकाश देशमुख, चॅम्पियन स्पोर्ट्स, विमा प्रतिनिधी राजेश गांधी, नगरसेवक उमेश सपकाळ, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी सभापती शौकत मुकादम ग्लोबल चिपळूण टुरिझम, चिपळूण नगर परिषद, पोलीस, महसूल विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies