बालवीर क्रीडा मंडळाकडून स्मशानभूमी व गणपती घाटाची स्वछता.
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन शहर वजा गाव या ठिकाणी असलेल्या रोहिदास समाज स्मशानभूमी तसेच त्याचाच बाजूला असलेल्या गणपती घाटाची स्वच्छता बालवीर क्रीडा मंडळ बोर्ली-पंचतन यांच्या कडून करण्यात आली.
अनेक दिवसांपासून बोर्ली-पंचतन गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पुलाशेजारील स्मशानभूमीजवळ व गणपती घाटावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत होते त्यामुळे स्मशानभूमीची व गणपती घाटाचे विक्षिप्त रूप पहावयास मिळत होते तसेच काही महिन्यांपासून गणपती घाट हा मद्यापीचा अड्डा बनला होता सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता तसेच काही ठिकाणी बाटल्या फोडून काचा विखुरलल्या दिसत होत्या.त्याचाच विचार करीत बोर्ली-पंचतन मधील रोहिदास सामाजातील बालवीर क्रीडा मंडळांतील युवकांनी एकत्रित येत स्मशानभूमी व गणपती घाटाची स्वच्छता करीत समाजापुढे एक आदर्श निर्माण केले आहे तसेच या पुढे जो कोणी स्मशानभूमी व गणपती घाटावर अस्वच्छता पसरवेल व मद्य पिताना आढळेल त्यावर कडक कारवाई ग्रामपंचायत यांनी करावी अशी मागणी देखील बालवीर मंडळाकडून होत आहे.