किलज ग्रा. पं.वर महिलाराज ; सरपंचपदी अर्चना शिंदे तर उपसरपंचपदी दिक्षा गवळी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

किलज ग्रा. पं.वर महिलाराज ; सरपंचपदी अर्चना शिंदे तर उपसरपंचपदी दिक्षा गवळी

 किलज ग्रा. पं.वर महिलाराज ; सरपंचपदी अर्चना शिंदे तर उपसरपंचपदी दिक्षा गवळी

राम जळकोटे-तुळजापूर


तुळजापूर तालुक्यातील किलज ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अर्चना खंडूराज शिंदे तर उपसरपंचपदी दिक्षा भरत गवळी  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

किलज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनशंभो  ग्रामविकास पॅनेलने आठ पैकी आठ जागांवर विजय मिळवला होता.सरपंचपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित होते.सरपंचपदासाठी अर्चना शिंदे व उपसरपंचपदासाठी दिक्षा गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाधव  यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक मातोळे यांनी त्यांना सहकार्य केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योती राठोड, पार्वती शिंदे,वेणूबाई भोईटे, उमेश पवार नामदेव गायकवाड, मोरेश्वर सोमवंशी यांचा व नूतन सरपंच उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला.निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी पॅनल प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य खंडूराज शिंदे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे,जिल्हा परिषद सदस्य. बालाजी बंडगर,संजय भोईटे ,यांच्यासह मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment