वाहतूक नियमांचे पालन करा.अमर भंडारे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

वाहतूक नियमांचे पालन करा.अमर भंडारे

 वाहतूक नियमांचे पालन करा.अमर भंडारे 

निमणी येथे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

सुधीर पाटील-सांगली 


निमणी ता. तासगाव येथील जय हनुमान चॅरीटेबल ट्रस्टचे वतीने पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी मध्ये रस्ता सुरक्षा अभियान निमित्त विद्यार्थी व ग्रामस्थ यांना रस्ता सुरक्षा नियमाविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून आर.टी.ओ .अधिकारी श्री अमर भंडारे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वाढत्या अपघाताचे कारण शोधले असता बहुतांश अपघात हे वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असता घडलेले लक्षात आले आहे हे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना मोबाईलचावापर करू नये व हेल्मेट विना वाहन चालवणे म्हणजे जीव धोक्यात घालणे काही अपघात प्रसंगी हेल्मेटमुळे वाहनचालकांचे जीव वाचले आहेत. वाहन चालवत असताना वाहन सुसाट वेगाने चालवू नका .वेगावर नियंत्रण ठेवा. चारचाकी वाहन चालवताना सिट बेल्टचा वापर करावा सुरक्षते संदर्भात नियमांचे अंमलबजावणी सोबत नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे. रस्ता सर्वांसाठी आहे. हे ध्यानात घेऊन रस्ते विषयी नियमांचे पालन केल्यासअपघात होणार नाहीत अशी माहिती अमर भंडारे साहेब यांनी दिली यावेळी रस्ते विषयी नियम सोप्या भाषेत सांगण्यात आले‌ यावेळी तासगाव पोलीस उपनिरीक्षक आर.आर .साळुंखे तासगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी .पाटील. शाळेचे मुख्याध्यापक पी.डी. गुरव.ट्रस्टचे अध्यक्ष विनय सपकाळ. सरपंच विजय पाटील. प्रहार जनशक्तिपक्षाचे तासगांव तालुका अध्यक्ष सुधीर पाटील पोलीस पाटील सतीश पाटील.आप्पासाहेब पाटील. ज्ञानेश्वर खरात. अशोक कांबळे. संजय देवकुळे .अक्षय पाटील व ग्रामस्थ शिक्षक वर्ग उपस्थित होते.


No comments:

Post a Comment