दोन आमदारांमध्ये रंगला कलगीतुरा
आमचं एकमेकांशी चांगलं नात आहे,परंतु पक्षवाढीसाठी संघर्ष करावा लागला तर मी तो करेन, आमदार शशिकांत शिंदेंच आमदार शिवेंद्रसिंहराजेना चोख उत्तर
प्रतिक मिसाळ-सातारा
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली असून माझी वाट लागली तरी चालेल , माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही असं वक्तव्य केलं आहे . शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप - प्रत्यारोप होताना दिसत आहेत . त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेलं हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे .सध्या सातारा जिल्ह्यात भाजप - राष्ट्रवादीत मोठा संघर्ष पहायला मिळत असून यात आता दोन आमदारांत कलगीतुरा रंगला आहे .शरद पवारांच्या आदेशानेच मला विधान परिषदेची आमदारकी देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे . शिवेंद्रसिंहराजे हे भाजपचे आमदार असल्याने मी जावळी तालुक्यात लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे . पक्षाने मला सातारा - जावळीतून उभे राहावे , अशी सूचना केलेली आहे .
त्यामुळे पक्ष संघटना वाढवित असताना त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतोय , असे त्यांना वाटले असेल . शिवेंद्रसिंहराजेंशी माझा वैयक्तिक वाद नाही , पण पक्ष स्तरावर आमचा वाद होऊ शकतो , असे प्रतिउत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले आहे . मी उदयनराजेंना पाडलेला माणूस , तुम्हालाही संपवल्याशिवाय राहणार नाही साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे काल कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे व उदयनराजेंवर भडकले . त्यांनी थेट शशिकांत शिंदेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान दिले . यावर आमदार शशिकांत शिंदेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की , माझा आणि शिवेंद्रसिंहराजेंचा वैयक्तिक वाद नाही . पण , पक्ष स्तरावर आमचा वाद होऊ शकतो . मला विधान परिषदेची आमदारकी देताना पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्ष , संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे . त्यानुसार सातारा व जावळी मतदारसंघात सध्या भाजपचा आमदार असल्याने मी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची पक्ष , संघ वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत . यातून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतोय , अशी भावना त्याचीझाली असेल . त्यातूनच त्यांनी कार्यकर्त्यांवर भडकले असतील , असेही त्यांनी स्पष्ट केले . शशिकांत शिंदे पुढे म्हणाले , माझी भूमिका पक्षासाठी काम करत राहणे हीच आहे , तसेच मला पक्षाकडून सातारा जावळीतून उभे राहावे , अशी सूचना करण्यात आलेली आहे . तसेच कोरेगावातून मी दहा वर्षे आमदार झालो होतो , तेथील लोकांशी मी बांधिल आहे . या सर्व परिस्थितीत कुठेतरी माझ्या मनात भावना असेलच ना , मी माणुसकी जपणारा आणि उपकार जाणारा साधा कार्यकर्ता आहे . उद्या ते राष्ट्रवादीच्या माध्यमातून पक्षात आले तर मी त्यांचे पहिले स्वागत करेन . पण ते भाजपमध्येच असतील तर जावळी , साताऱ्यात पक्ष संघटना वाढीसाठी मला काम करावेच लागेल , असा इशाराही आमदार शिंदेंनी शिवेंद्रराजेंना दिला आहे .
आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची एंट्री
आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एन्ट्री घेत , "राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात काही अर्थ नसतो.कदाचित कार्यकर्त्यांना बरं वाटावं ,ते आपल्या सोबत राहावेत यासाठी कोणीतरी काहीतरी बोललं जातं परंतु मला त्याबद्दल काहीही माहिती नाही ,त्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही"अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजेंच्या वक्त्याव्यवर दिली. त्यामुळे हा वाद असाच सुरु राहणार की , यावरती कोणता तोडगा निघणार हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे .