Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महावितरणच्या व महाविकास आघाडीच्या मनमानी वीज थकबाकी वसुली विरोधात कर्जत भाजप यांचे कार्यालयासमोर आंदोलन

 महावितरणच्या व महाविकास आघाडीच्या मनमानी वीज थकबाकी वसुली विरोधात कर्जत भाजप यांचे वतीने वीज कार्यालयासमोर आंदोलन

     ज्ञानेश्वर बागडे/नरेश कोळंबे-कर्जत      



            वीजबिल न भरल्यास वीजग्राहकांवर कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरोधात ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कर्जत महावितरणच्या कार्यालयाला टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले . 

     


      महाविकास आघाडी सरकारने थकबाकी न भरणाऱ्या थकबाकी दारा ना कोणताही धीर न देता सर्वांचे वीज कापण्याचे आदेश दिले आहेत या विरोधात आज कर्जत भाजपच्या वतीने कार्यालयाला टाळा ठोको तथा हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलनकारी भाजप कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असे सांगितल्यावर महावितरण चे अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी ठराविक लोकांसोबत चर्चा करण्याचे व लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनास कर्जत मधील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनात सहभाग घेतला. 

   


      याप्रसंगी कर्जतचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे,  जिल्हाउपाध्यक्ष वसंतराव भोईर,  उपनगराध्य अशोक ओसवाल,  नगरसेवक बळवंत घुमरे , नगरसेविका स्वामींनी मांजरे,  तालुका सरचिटणीस संजय कराळे , तालुका महिला अध्यक्ष स्नेहा गोगटे,  उद्योग आघाडीचे संयोजक मंदार मेहेंदळे,  किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे,  पराग गायकवाड , शिरीष कदम , विनायक पवार,  किरण ठाकरे , विनायक उगले,  शर्वरी कांबळे, मयूर शितोळे ,सर्वेश गोगटे,  सुर्यकांत गुप्ता,  सुजल गायकवाड,  ऋत्विक आपटे , दळवी काका,  दिनेश भरकले असे बहुसंख्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies