भाजपाचे कळंबमध्ये विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

भाजपाचे कळंबमध्ये विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन.

 भाजपाचे कळंबमध्ये विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन. 

शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाला ठोकले टाळे.

राम जळकोटे-उस्मानाबाद


वीज वितरण संदर्भातील विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कळंब शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.यावेळी महावितरणचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने लॉगडाऊन काळातील विजबिल माफ करू अशी खोटी अशा दाखवली तसेच शेतकऱ्यांना मोफत विज देण्याचे आश्वासन निवडणुका पुर्वी देण्यात आले होते,परंतु शेतकऱ्यांना मोफत नाही तर 8 तास सुध्दा वीज मिळत नाही सर्व सामान्य वीज ग्राहकांना अंदाजे बील देऊन सक्तीची वसुली होत आहे या सर्व कारभाराचा निषेध म्हणून कळंब येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे,तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,किसान मोर्चा जिल्हा संयोजक संजय पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे,युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार,तालुका सरचिटणीस संजय जाधवर,माणिक बोंदर,संतोष कसपटे,अरुण चौधरी,नानासाहेब यादव,संदीप बाविकर,मीनाज शेख,सतपाल बनसोडे,शिवाजी गिड्डे,मकरंद पाटील,नारायण टेकाळे,नागनाथ घुले,राजकुमार यादव,अरविंद कदम, रामकिसन कोकाटे, जिव्हेश्वर कुचेकर, गणेश देशमुख,सिद्धेशराजे भोसले,सुधीर बिक्कड इम्रान मुल्ला, आबासाहेब रणदिवे, राजेश टोपे,बालाजी मडके,कमलाकर भोरे, विक्रम भंडारे,रियाज पठाण,गोविंद गायकवाड यांच्यासह कळंब तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment