जल जीवन मिशन आराखड्यातील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे डोंगरी विभाग विकास आराखड्यातील कामे वेळेत करा -पालकमंत्री बाळासाहेब पाटील - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

जल जीवन मिशन आराखड्यातील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे डोंगरी विभाग विकास आराखड्यातील कामे वेळेत करा -पालकमंत्री बाळासाहेब पाटील

 जल जीवन मिशन आराखड्यातील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे डोंगरी विभाग विकास आराखड्यातील कामे वेळेत करा -पालकमंत्री बाळासाहेब पाटील

प्रतिक मिसाळ -सातारा



जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरात वैयक्तिक नळ जोडणीच्या कामांचे उद्दीष्ट पूर्ण करावे या योजनेच्या कामास अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे , अशा सूचना राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिल्या . जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गृह ( ग्रामीण ) , वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी ते बोलत होते . यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले , आमदार जयकुमार , आमदार दिपक चव्हाण , आमदार महेश शिंदे , जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांच्यासह बांधकाम विभाग , महिला बाल विकास , लघुपाटबंधारे विभाग , पाणी पुरवठा विभागाचे संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते . केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन या मिशन अंतर्गत सन 2024 अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पूर्नजोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान 55 लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबध्द आहे . ही योजना येत्या चार वर्षात पूर्ण करावयाची आहे . यासाठी संबंधित अधिका - यांनी या योजनांची चालू वर्षातील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे . सातारा जिल्ह्यासाठी सन 2020-21 आराखड्यात सद्यस्थितीत प्रगतीपथावर असलेल्या व नवीन प्रस्तावित तसेच जुन्या पूर्ण योजनांच्या नळ पूर्नजोडणीच्या 1963 योजनांसाठी 147.68 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . जल जीवन मिशन योजना राबवितांना संबधित तालुक्यातील आमदारांच्या सूचना विचारात घ्याव्यात , असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.



जल जीवन मिशन ही योजना राबवितांना अडचणी आल्यास त्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक घेऊन त्या सोडवण्यास प्राधान्य देऊ , असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले . यावेळी कार्यकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस . एस . शिंदे यांनी जल जीवन मिशन योजनेचे सादरीकरण सादर केले . डोंगरी विभाग विकास आराखड्यातील कामे वेळेत करा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर आराखड्यातील कामे वेळेत व्हावीत , यासाठी डोंगरी विभागातील विकास आराखड्यातील रस्ते , बांधकाम , पाणीपुरवठा आदी कामांच्या मान्यतेचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत . त्यास तात्काळ मान्यता दिली जाईल , अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

No comments:

Post a Comment