शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश उंब्रज,(कराड )येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यास परवानगी;
उंब्रजच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई
कुलदीप मोहिते कराड
उंब्रज सारख्या गजबजलेल्या व मोठी बाजारपेठ असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी समस्त उंब्रज ग्रामस्थांची इच्छा तसेच मागणी होती ही मागणी लक्षात घेता शिव योद्धा प्रतिष्ठान उंब्रजने गेली पाच वर्ष नामदार गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे ,व तत्कालीन पालकमंत्री विजय बापू शिवतारे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली शासन दरबारी वेळोवेळी प्रस्ताव देऊन त्याचा पाठपुरावा केला मग ती शिवस्मारकासाठी जागा उपलब्ध करून घेण्यापासून ते सर्व मंजुरी मिळवण्यापर्यंत अखेर शिव योद्धा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास परवानगी मिळाली याचे औचित्य साधून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलत नगर शिवयोद्धा प्रतिष्ठान व उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले; "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे निश्चितच उंब्रजच्या वैभवामध्ये भर पडणार आहे व उंब्रजच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे ठोस आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले तसेच शिवयोद्धा प्रतिष्ठानने केलेले काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे "असेही ते यावेळी म्हणाले . यावेळी शाल श्रीफळ व पेढे देऊन नामदार शंभूराजे देसाई व शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांचा सत्कार शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रजचे उपाध्यक्ष शरद जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिव योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके उपाध्यक्ष शरद जाधव सचिव महेश जाधव खजिनदार रणजीत कदम सचिन जाधव ,रवींद्र वाकडे ,मंदार ढवळीकर इत्यादी उपस्थित होते निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानगीमुळे उंब्रज व आजूबाजूच्या परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.