Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत दोन्ही वाहने पेटली,एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळील घटना

 

कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत दोन्ही वाहनांनी घेतला पेट,एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळील घटना

महाराष्ट्र मिरर टीम-खोपोली



मुंबई पुणे एक्सप्रे वे वर KM 37/600 या ठिकाणी साधारणपणे 12:20 वाजण्याच्या सुमारास MH.46.BF.7713  हा कंटेनर मूंबईच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल झाल्याने लेन क्रॉस करून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या MH.12.MV.7004 या ट्रकला धडकला.या धडकेने दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. 


ही दुर्दैवी घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असल्याने पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताची कारणमीमांसा तपासली जाणार असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस -बोरघाट, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, अफसकॉन कंपनी यांनी मदतकार्य केले. खोपोली नगर पालिका, उत्तम गेलव्हा आणि अन्य अग्नी शमन यंत्रणेने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आग विझविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अद्याप सुरू असून.  मदतकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा जीव धोक्यात घालून घटनास्थळी होत्या.आगीचा उठणारा भडका, स्फोटकासारखे उडणारे ड्रम, धुराचे लोट, पसरलेल्या दुर्गंधीमध्ये सर्वच यंत्रणा जिवापाड मेहनत घेत होत्या आणि अजूनही हा प्रकार सुरू आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे.



अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य या घटनेत मदत करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies