"मुरुड तालुक्यात आरोग्य सेवेसोबत शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कार्य उभे राहिले पाहिजे - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, March 29, 2021

"मुरुड तालुक्यात आरोग्य सेवेसोबत शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कार्य उभे राहिले पाहिजे

 "मुरुड तालुक्यात आरोग्य सेवेसोबत शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कार्य उभे राहिले पाहिजे"_ डॉ .सनाउल्ला घरटकर यांचे प्रतिपादन

अमूलकुमार जैन-मुरुडमुरुड मध्ये संजीवनी आरोग्य सेवा समितीतर्फे डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना उत्तम सेवा दिली जात आहे . तथापि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 

शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कार्य करणारी संस्था पुढे आली पाहिजे असे महत्वपूर्ण प्रतिपादन 

आखाती देशातील प्रथितयश उद्योगपती डॉ .सनाउल्ला घरटकर यांनी संजीवनी डायलिसिस सेंटर मुरुड तर्फे  आयोजित सत्काराला उत्तर देतांना केले . आणि नवीन एक डायलिसीस मशीन देण्याची घोषणा केलीआपल्या भाषणात डॉ .घरटकर म्हणाले की , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता हेरून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे व व्यावसायिक मार्गदर्शन शिबीरे आयोजित करून पालकांसह विद्यार्थ्यांशी संवाद केला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले .

प्रास्ताविक करतांना कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी डॉ . तात्याराव लहाने यांच्या पुढाकाराने संजिवनी आरोग्य सेवा केद्राच्या मार्फत डायलिसीस सेंटर कार्यान्वित झाले असुन 

या सेंटर ला 55 लाखांची सुसज्ज कॉर्डीयक रुग्णवाहिका देऊन डॉ . घरटकर यांनी मोलाचे अर्थसहाय्य केल्याबद्दल त्यांचा या प्रसंगी शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला . 

      महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ मुरुड सह म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना देता येणे शक्य झाल्याचे सांगुन डॉ . घरटकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली . त्यांचे या पुढे ही असेच आर्थिक योगदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला .

या वेळी राशिद फहीम व डॉ .कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . शेवटी शकील कडू यांनी आभार प्रदर्शन केले .

या वेळी  संजीवनी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, डायलिसिस सेंटर चे विभाग प्रमुख डॉ .मकबुल कोकाटे , मुरुड नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मंगेश दांडेकर , अॅब्युलन्स समिती अध्यक्ष राशिद फहीम , नगरसेवक प्रमोद भायदे , खजिनदार किर्ती शहा , नितीन अंबुर्ले, शशिकांत भगत , के.डी. साने , जहूर कादिरी , शकील कडू , आदेश दांडेकर , डॉ . बिरवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते .

No comments:

Post a Comment