"पुण्यात मिनी लॉकडाऊन"
मिलिंद लोहार-पुणे
राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळतीये. पुण्यातही कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतीये.
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परषद घेत नव्या निर्बधांसंदर्भात माहिती दिली.
सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळ, सार्वजनिक बस वाहतूक पुढचे सात दिवस पूर्ण बंद असणार आहेत.लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकिय कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली आहे.