'माथेरानमध्ये मोबाईलवर फेसबुक डी पी ठेऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अनोखा सन्मान'
कोरोना काळात डॉक्टर, नर्स कर्मचारी वर्गाच्या सेवेस माथेरानकर भारावले
चंद्रकांत सुतार- माथेरान
निसर्गरम्य प्रदुषणमुक्त माथेरानसारख्या पर्यटन स्थळालाही कोरोना सारख्या संसर्गाने वेढले आहे, त्यामुळे सर्वत्र संचारबंदी ,निर्भध असले तरी कोरोनाचा आलेख वाढत चालल्याने माथेरान च्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडला आहे, माथेरान नगरपरिषदेच्या दवाखाण्यात अपुऱ्या वैद्यकीय सेवा असताना. सद्याच्या कोरोना परिस्थितीची तीव्रतेची जाणीव येथील संपूर्ण वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्गाला आहे त्यामुळे , लोकांचे जरी कोरोना बाबत दुर्लक्ष हलगर्जी पणा असला तरी येथे आलेल्या रुग्णांना येथील डॉक्टर स्टाफ शान्त संयमाने धीर देत व्यवस्तीत उपचार करत आहे,.कोरोना रुग्णाना उपचारा साठी इतरत्र न नेता इथेच त्याची उपचार करून जीवदान देण्याची महत्त्वाची भूमिका येथील एमबीबीएस.प्रशांत यादव डॉ उदय तांबे, आरोग्य अधिकारी सदानंद इंगळे, परिचारिका स्नेहा गोळे, वनिता दिघे, प्राजक्ता, शिंदे, राजू वाघेला, सखाराम साबरी, नीता सावरीया, रवी लोटनकर, रुपेश गायकवाड, व रुग्ण वाहिका वाहक प्रशांत कदम, अमोल सोनवणे,आशिष परब, अजिक्य सुतार, हा सर्व वैदयकीय स्टाफ अहोरात्र काम करत आहेत, माथेरानचे रोजचे तपासणीचा भार,कोरोनाबाधित रुग्ण, लसीकरण औषधांचा तुडवडा, असा सर्वच कामाचा तानातूनही आजच्या मितीस माथेरानला 80 च्या वर कोरोना बाधित रुग उपचार करत असताना आज पर्यंत एकही रुग दगावलेला नाही जमेची बाजू डॉ प्रशांत यादव ह्याचा कोरोना रुग्णानविषयी आदर आहे,ते कोरोना बाधित रुग्णांना तपासणी करताना किट्स मास्क न वापरता सहजपणे त्याच्या सानिध्यात जाऊन तपासनी करत धीर देत आहेत त्यामुळे रुग्णांनाही कोरोनविषयी भिती दूर होत असताना, उपचार योग्य होत आहे याची जाणीव होतेय. अनेक रुग्ण, त्याचे नातेवाईक बोलत आहेत की डॉ.प्रशांत यादव सर व त्याच्या सर्व स्टाफ मुळे आम्ही आमची व्यक्ती सुखरूप घरी आली, येथील रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा नसताना येथील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची प्रमाण 100%टक्के आहे . कोरोना काळात वैदयकीय सेवा देणारे डॉक्टर कर्मचारी ,अधिकारी वर्गाने माथेरानवर केलेल्या, करत असलेल्या ह्या सेवे बद्धल ऋण आभार सन्मान व्यक करण्यासाठी दिनांक 21 /4/2021 बुधवार रोजी सर्व माथेरानकराणी आपल्या मोबाईल वर ह्या सर्व वैद्यकीय स्टाफचा dp ठेऊन एक छोटे खाणी अनोखा सन्मान ऋण व्यक्त केले हा अनोखा सन्मान वैद्यकीय डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी वर्गांना अजून स्फूर्ती देऊन जाईल हे नक्की