उद्धव ठाकरे करणार का उद्या मोठी घोषणा?का नरेंद्र मोदिंनी सांगीतलेल्या सूचनाची अमलबजावणी करणार ? - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 21, 2021

उद्धव ठाकरे करणार का उद्या मोठी घोषणा?का नरेंद्र मोदिंनी सांगीतलेल्या सूचनाची अमलबजावणी करणार ?

 उद्धव ठाकरे करणार का उद्या मोठी घोषणा?का नरेंद्र मोदिंनी सांगीतलेल्या सूचनाची अमलबजावणी करणार ?

किशोर उकरंडे- पुणेमहाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडीसीवीर, यांचा तुटवडा भासत आहे. करोनाची ही साखळी तोडण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या रात्री ८ पासून राज्यात कडकडीत लॉक डाऊन करण्यात यावा अशी मागणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यानी केली आहे.


याबाबतची माहिती राज्याचे आरोयमंत्री राजेश टोपे यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. 'राज्यात उद्या रात्री ८ पासून संपूर्ण लॉक डाऊन करण्यात यावा अशी मागणी सर्व मंत्र्यानी केली असून यावर काय निर्णय घ्यायचा हे आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील' अशी माहिती त्यांनी दिली.

राजेश टोपे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतात का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment