Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे ही 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना होणार.

 देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे ही 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने  रवाना होणार. दहा रिकामे ट्रक टँकर रेल्वेने जाणार विशाखापट्टणमला.

अमूलकुमार जैन-अलिबागरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कळंबोली येथील रेल्वे स्थानकात आज दिनांक 19 एप्रिल रोजी विशेष ऑक्सिजन ट्रेन कळंबोली स्थानकातून  विशाखापट्टणम येथे लिक्वीड ऑक्सिजन आणण्यासाठी ट्रक टँकर पाठविण्यात येत आहे.टँकर चढवण्याकरिता लागणारा विशेष कळंबोली स्थानक येथे विशेष  प्लॅटफॉर्म व विशेष ट्रॅक गेल्या 48 तासांत तयार करण्यात आला आहे.

विशाखापट्टनम येथे रेल्वेमार्फत राज्य सरकारला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात ऑक्सीजन चा तुटवडा कमी करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणण्यासाठी  आणि रिकामे ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेने पूर्ण तयारी केली आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे . 


कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायॉक , जमशेदपूर , रौरकेला , बोकारो येथे रवाना झाले आहेत . तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे .


मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ( एलएमओ ) टँकर रेल्वेने हलवू शकतात का याचा शोध घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे संपर्क साधला होता . रेल्वेने तातडीने एलएमओ वाहतुकीची तांत्रिक शक्यता शोधून काढली.फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रो-रो सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करावी लागेल , असं रेल्वेने सुचवलं होते.


17 एप्रिल रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी , राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्द्यांवर बैठक पार पडली . टँकर हे परिवहन आयुक्त , महाराष्ट्र यांच्याकडून दिले जातील , असा निर्णय झाला .


 रिकामे टँकर कळंबोली  रेल्वे स्थानकांमधून ऑक्सिजन लोड करण्यासाठी वायॉक आणि जमशेदपूर / रौरकेला / बोकारो येथे पाठविले जातील . 

 

रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हरहेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादमुळे अडचणी येण्याची शक्यता होती . त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी , रोड टँकर टी 1618 चे मॉडेल लावले जाणे शक्य असल्याचे आढळले, हे टँकर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर चढविण्यात आले आहेत . वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत .

 ३३२० मिमी उंची असलेले टँकर्स मॉडल T 1618 यासाठी उपयोगी ठरले . 

 

१५ एप्रिलला मुंबईतील कळंबोली गुड्स शेडमध्ये डीबीकेएम वॅगन आणण्यात आल्या . यासोबत लिक्विड ऑक्सिजनने भरलेला एक टी 1618 टँकरही आणला गेला .


  रेल्वे एका वॅगनवर लिक्विड ऑक्सिजनने भरलेला टँकर ठेवण्यात आला . त्यानंतर त्याचे माप घेण्यात आले . रेल्वेने याआधी कळंबोली आणि इतर ठिकाणीही अशा प्रकारची चाचणी घेतली.

  

आता सोमवारी १० रिकामे टँकर्स रवाना करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies