Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत शासनाची मार्गदर्शक तत्वे व व्यवस्थापन

रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत शासनाची मार्गदर्शक तत्वे व व्यवस्थापन      कोविड- १९ रुग्णांना उपचारासाठी इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅ. (Inj. Remdesivir १०० mg) हे औषध वापरले जात आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात (Fixed Rate) इंजेक्शन रेमडेसिवीर उपलब्ध व्हावे, यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


      रायगड जिल्हयासाठी 1) देवासाई केमिस्ट अँड ड्रगिस्ट, दुकान नं.6, तळमजला, सुशिल व्हिला सोसायटी, प्लॉट नं.28/1,ठाणे नाका रोड, लिज्जत पापड केंद्राजवळ, पनवेल, जि.रायगड -410206, सुशिल माली, मोबाईल नं. 9820094941, devasaipanvel@gmail.com  


2) प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, दुकान नं.2, हाऊस नं.595, साई मंदिरासमोर, मु.पो.खंडाळा, जि.रायगड -410206, प्रियांका वासुदेव पाटील,मोबाईल नं.8169280855, 7506723517, pharmapatilpriyanka07@gmail.com हे औषधी विक्रेते नेमण्यात आले आहेत.


*इंजेक्शन रेमडेसिवीरची निश्चित दराने फार्मसीमध्ये उपलब्धता:-*

.अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत इंजेक्शन रेमडेसिवीर उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्हयातील खाजगी औषधी केंद्रे (Pharmacy) निश्चित करण्यात आली आहे.


·प्रत्येक जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून जिल्हयातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम ची दैनिक गरज निश्चित करण्यात येईल आणि ती संचालक, आरोग्य सेवा पुणे यांना कळविण्यात येईल.


·संचालक आरोग्य सेवा, पुणे यांनी जिल्हयांच्या रुग्णसंख्येनुसार प्रत्येक जिल्हयाचा इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम चा कोटा निश्चित करुन तो आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना दयावा.


·या योजनेमध्ये समाविष्ट उत्पादक कंपन्यांकडून दररोज निश्चित केलेल्या दराने ५००० पर्यंत इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम पुरविण्यात येतील. या व्हायल्स पहिल्या वेळी संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी कोटा निश्चित केल्यानुसार व त्यानंतर वापरलेल्या व्हायल्स् नुसार नेमून दिलेल्या खाजगी फार्मसी स्टोअरला वितरीत करण्यात येतील. याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन यांची राहील.


·इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम या योजनेतील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांसाठीची किंमत ही रु. २२४० + रु. १२० (५% खाजगी औषधी केंद्रांचे कमिशन) = रु.२३६०/- प्रति १०० mg Vial असेल.


कार्यक्षेत्राचे वाटप:-

.निश्चित केलेल्या दरामध्ये इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम उपलब्ध करुन देणारे प्रत्येक खाजगी औषधी केंद्र (Pharmacy Store) रुग्णांना औषध वितरण मान्यतेसाठी मुंबईमध्ये कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि इतर जिल्हयातील जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संलग्न करण्यात येईल. त्यामुळे या औषधी केंद्रांच्या दैनंदिन वाटप आणि साठा नियंत्रण यामध्ये सुसूत्रता येईल.


इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम पुरविण्यासाठी परवानगीकरीता सक्षम अधिकारी :-


·इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम पुरविण्याची परवानगी देण्यासाठी खालीलप्रमाणे सक्षम अधिकारी नेमण्यात येतील


1) मुंबई महानगरपालिका क्षेत्र:- कार्यकारी आरोग्य अधिकारी किंवा त्यांनी नेमलेले शहरातील आवश्यक तेवढे आरोग्य अधिकारी.

2) जिल्हा मुख्यालये:- जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्यांनी नेमलेले वैद्यकीय अधिकारी.

3) जिल्हा मुख्यालय सोडून इतर शहरे:- त्या शहरातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किंवा त्यांनी नेमलेले वैद्यकीय अधिकारी.


इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम पुरवठा पध्दती :-

१) इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम लागणाऱ्या खाजगी रुग्णालयाने हे इंजेक्शन आवश्यक असल्याबाबतचा प्रस्ताव त्या शहरातील परवानगीसाठी सक्षम अधिकाऱ्याकडे (आरोग्य अधिकारी (मुंबई शहर), जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक) सादर करणे आवश्यक राहील.


२) खाजगी रुग्णालयाच्या प्रमुखाने प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडावीत-

·इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम prescription,


·रुग्णांचा SARS COV-2 Positive report -ICMR ID सह


.रुग्णाच्या आधारकार्डची किंवा इतर फोटो असलेले परवाना / प्रमाणपत्र याची प्रत,


·रुग्णाची थोडक्यात क्लिनिकल माहिती (Short clinical history)


३) या योजनेसाठी इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयांनी मुंबईबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई यांनी निश्चित केलेली मुंबई महानगरपालिकेची कार्यालये / रुग्णालये व इतर ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय किंवा अपघात विभाग जेथे २४ तास वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपलब्ध आहेत व दूरध्वनी सेवा आहे, अशा ठिकाणी प्रस्ताव स्विकृत करण्याची सोय करावी व तशा सूचना रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावाव्यात, जनतेला व रुग्णालयांना समजण्याच्या दृष्टीने प्रसिध्द कराव्यात.

(४) शासनाने नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यांनी औषध प्रस्ताव स्विकृत करण्यासाठी उपरोक्त ठिकाणी २४ तास एक फार्मासिस्ट उपलब्ध करुन दयावा. या फार्मासिस्टने प्रस्ताव प्राप्त होताच परिपूर्ण असल्याची खात्री करून रुग्णाला इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम देण्याच्या सूचना आहेत का, हे निश्चित करण्यासाठी या योजनेसाठी सक्षम अधिकाऱ्यांनी नेमलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना  सादर करावे.

५) संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासून इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम आवश्यक असल्याची खात्री करावी. इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम आवश्यक असल्यास तशी नोंद Short Clinical History वर करावी. ही कार्यवाही प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर १ तासाच्या आत करावी. कागदपत्रे अपूर्ण असल्यास काय अपूर्णता आहे, याची स्पष्ट नोंद करुन प्रस्ताव परत करावा. सर्व अपूर्तता एकाच वेळी नोंदवावी. पुन्हा पुन्हा प्रस्ताव परत करण्यात येऊ नये.

(६) इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम आवश्यक असल्याचा निर्णय झाल्यास फार्मासिस्ट यांनी याबाबतची नोंद इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम खरेदी मान्यता रजिस्टरमध्ये करावी. रुग्णाचा तपशील व खाजगी रुग्णालयाच्या नाव व पत्यासह) नेमून दिलेल्या खाजगी औषधी केंद्रांस या पत्रामध्ये इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम च्या दराचा व संख्येचा स्पष्ट उल्लेख असावा.


खाजगी औषधी केंद्रांनी निश्चित केलेल्या दराने औषध उपलब्ध करुन देणे:-

·खाजगी औषधी केंद्रांकडे मागणीपत्र आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये नमूद केलेल्या संख्ये इतके इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम (जास्तीत जास्त ६ व्हायल्स) रु.२३६०/- प्रति व्हायल करासहित) या दराने उपलब्ध करावे. याचे बील संबंधीत रुग्णाकडून घ्यावे.


·रुग्णाने / नातेवाईकांनी सदर औषधासाठी शासनाने निश्चित केलेल्या दराने रु.२३६०/- प्रति व्हायल खाजगी औषध केंद्रास अदा करावे.


·संबंधित फार्मसीने त्यांच्या रजिस्टरमध्ये रुग्णाचा तपशील आणि दिलेल्या व्हायल बॅच क्रमांकासह नोंद करावी आणि मागणीपत्र रेकार्डसाठी जपून ठेवावे, तसेच दररोज रात्री ८.३० वाजता शिल्लक साठ्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना आणि सक्षम अधिकारी यांना उपलब्ध करुन दयावी.


·अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी ही माहिती दररोज जिल्हाधिकारी यांना सादर करावी, यासाठी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी प्रत्येक जिल्हयासाठी एक नोडल अधिकारी निश्चित करावा.


*इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम खर्च शिल्लक ताळमेळ:-*

.अन्न व औषध प्रशासन विभागाने उत्पादकामार्फत इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम पुरवठा झाल्यानंतर किती इंजेक्शन पुरवठा झाला, याची प्रत्येक खाजगी औषधी केंद्रांनुसारची संख्या मुंबईमध्ये कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि इतर जिल्हयांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना कळवावी.


·सक्षम अधिकारी कार्यालयातील फार्मासिस्ट यांनी परवानगी पत्र निर्गमित केल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे संबंधित औषधी केंद्रांच्या नोंदविलेल्या साठयामधून तेवढी संख्या वजा करावी.


·आठवडयातून ठरलेल्या एक दिवशी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी खाजगी औषधी केंद्रांस भेट देऊन साठा तपासणी, वितरण याची कागदपत्रे तपासावीत आणि औषधी केंद्रांमध्ये असलेला अचूक साठा संबंधित सक्षम अधिकाऱ्यांस कळवावा व याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी

आणि आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना सादर करावा.


·सक्षम अधिकारी स्तरावर याबाबत ताळमेळ घेण्यात येऊन आवश्यकतेनुसार साठा संख्येमध्ये दुरुस्ती करण्यात यावी.


·या योजनेंतर्गत पुरवठा करण्यात आलेले इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय इतरांना देण्यात येणार नाहीत, याची दक्षता अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी साप्ताहिक तपासणीच्या वेळी घ्यावी.

     अशा प्रकारे शासनाने जनतेच्या सोईकरीता इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅम च्या उपलब्धतेबाबत पारदर्शक अशी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्यामुळे इंजेक्शन रेमडेसिवीर १०० मि.ग्रॅमचा काळा बाजार रोखण्यास निश्चित यश मिळेल.


मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies