Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

लॉकडाऊनमध्ये माथेरान मधील अश्वपालकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी राकेश कोकळे यांचे शासनाला साकडे

 "लॉकडाऊनमध्ये माथेरान मधील अश्वपालकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी राकेश कोकळे यांचे शासनाला साकडे"

चंद्रकांत सुतार--माथेरान

देशभर दुसरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे माथेरान मधील हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य अश्वपालकांना सुध्दा शासनाने आर्थिक मदत द्यावी यासाठी येथील प्रभाग क्र.१२ मधील कार्यशील समाजसेवक तथा अश्वपालक, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते,धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांना लेखी निवेदन सादर करून इथल्या अश्वपालकांना या दुसऱ्या लॉक डाऊन मध्ये आर्थिक मदत मिळावी यासाठी साकडे घातले आहे.

शासनाने लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षा चालकांना १५०० रुपये मदत जाहीर केली आहे त्याच धर्तीवर येथील गोरगरीब अश्वपालकांना सुध्दा शासनाने आर्थिक मदत जाहीर करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हातभार लावावा. आजवर इथे पर्यटकांना वाहतूक करण्यासाठी पॉईंटसच्या सफरीसाठी घोडा हे एक हौशी वाहन उपलब्ध आहे. तर हेच वाहन खऱ्या अर्थाने माथेरानची शान समजले जाते. खासकरून घोड्यांची रपेट करण्यासाठी घोडेस्वार आवर्जून या ठिकाणाला भेट देत असतात. घोड्यांच्या खुराकाचा खर्च दिवसाला २५० रुपये इतका असतो. इथल्या सर्वांचे जीवनमान हे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते आणि आता हे दुसरे लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे आम्हा गोरगरीब घोडेवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे या लॉक डाऊनच्या कठीण प्रसंगी शासनाच्या वतीने अश्वपालकांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे एक होतकरू निस्वार्थी कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे शासन काय निर्णय घेईल याकडे सर्वसामान्य गोरगरीब अश्वपालकांचे लक्ष लागून राहिले आहे. तर मागील लॉक डाऊनच्या कार्यकाळात राकेश कोकळे यांनी अनेकदा अश्वपालकांच्या घोड्यांसाठी भुसा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो त्यामुळेच अश्वपालकांनी त्यांचे कौतुक करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies