Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ऐतवडे खुर्दचा वळण रस्ता अपघाती धोक्याचा,ग्रामपंचायतीकडून सुरक्षितता : मोटरसायकलस्वारांनी काळजी घ्यावी

 ऐतवडे खुर्दचा वळण रस्ता अपघाती धोक्याचा,ग्रामपंचायतीकडून सुरक्षितता : मोटरसायकलस्वारांनी काळजी घ्यावी

उमेश पाटील -सांगली 

     ऐतवडे खुर्द - चिकुर्डे रस्त्यावरील या रस्त्यावरती आजपर्यंत अनेक अपघात घडले असून दोघांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावरती दिशादर्शक व लोखंडी संरक्षण कंपाऊंडची उभारणी ग्रामपंचायत व कट्टा ग्रूप कडून करण्यात आली आहे. ऐतवडे खुर्द सह परिसरातील मोटर कार चालक व मोटर सायकल स्वार यांनी काळजीपूर्वक वाहने चालवावी असे आवाहन ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. 

  वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथून चिकुर्डे, मांगले, शिराळा आदी गावांना जाण्या येण्याकरिता या परिसरातून ऐतवडे खुर्द - चिकुर्डे हा रस्ता आहे. या रस्त्यावरती ऐतवडे खुर्द गावा जवळच दोन मोठी वळणे आहेत. अतिशय काटकोनातील ही वळणे असल्याने याठिकाणी वाहनचालकाला वाहना वरती ताबा मिळवत असताना फार मोठी कसरत करावी लागते आहे. ऐतवडे खुर्द गावाहून चिकुर्डेला जात असताना व ऐतवडे खुर्द गावाला येत असताना दोन्ही बाजूने ही वळणे धोकादायक आहेत. याशिवाय या वळणांच्या ठिकाणी रस्ता उंच असून रस्त्याच्या दोन्ही कडेला खोली जास्त आहे. त्यामुळे एकंदरीतच येथील या रस्त्यांची भयानकता नजरेसमोर पडत आहे.

   या वळण रस्त्यावरती एका युवकाला जीव गमवावा लागला आहे. हा युवक व्यवसाय आटोपून रात्री घरी जात असताना या वळणावरती या युवकाचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी या वळणावरती वाहनावरील ताबा मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे हा अपघात घडला. पुढच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना उतारामुळे वेग येतो आहे व तो वेग या वळणावरती कंट्रोल होत नाही. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.

  या वळण रस्त्यावरती संबंधित यंत्रणेकडून दिशादर्शक तसेच संरक्षक कंपाउंड तयार करण्याची मागणी ऐतवडे खुर्द गावातील युवक मंडळांच्याकडून तसेच परिसरातील नागरिकांच्या कडून करण्यात आलेली होती. ग्रामपंचायत प्रशासनाने या रस्त्यावरील होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य ओळखून याठिकाणी उपायोजना निर्माण केलेल्या आहेत. या गवळण रस्त्यावरती ग्रामपंचायतीकडून लोखंडी सौरक्षक संरक्षण करण्यात आलेले आहे याशिवाय या ठिकाणी रात्रीच्या वेळी वळण रस्ता आहे हे लक्षात येण्याकरिता दिशादर्शक एकही लावण्यात आलेले आहेत हे दिशादर्शक रात्रीच्या वेळेस चमकत असल्याने वाहन चालक याच्या निदर्शनास येण्यास सोपे झाले आहे.


       ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच संभाजी पाटील म्हणाले, एकंदरीत या ठिकाणी वारणा नदी पाण्याचे बॅक वॉटर येत असल्याने फुल बांधला गेला आहे. या बॅक वॉटर च्या नुसार पुलाची उंची करण्यात आली आहे. पुल उंच असल्यामुळे येथे रस्ता उंचा वरती झालेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सखल भाग असल्याने हा वळण रस्ता धोक्याचा बनला आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून आव्हान करण्यात आले आहे की, वळण रस्त्यावरती बेताचाच वेग मोटर सायकल अथवा मोटर कार साठी वापरण्यात यावा.वळण रस्ता मोठा असल्याने मोटर सायकल किंवा मोटर कार वेगात असेल तर ताबा मिळविणे जिकिरीचे होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता राहते आहे. यापेक्षा या रस्त्यावर ती वाहनचालकांनी बेताचा वेग वापरूनच वाहन चालवणे सोयीस्कर ठरणार आहे. तरीही या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून दिशादर्शक तसेच इतर सोयी सुविधा निर्माण करून लोक हिताच्या दृष्टीने कामकाज केले आहे.

 

रात्रीच्या वेळी या वळण रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय धोक्याचे होते. परंतु सध्या ग्रामपंचायत व कट्टा ग्रुप कडून या वळण रस्त्यावरती लोखंडी संरक्षण व चमकणारे दिशा दर्शक लावले असल्याने वाहन चालक सावध पवित्र्यात येऊन वाहनाचा वेग बेताचा करतो आहे. त्यामुळे या ठिकाणाहून सुरक्षित प्रवास होण्यास मदत होते आहे.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies