साई मेडिकल फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, April 2, 2021

साई मेडिकल फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम

 साई मेडिकल फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम

 कु साईशा मोहिते हिच्या वाढदिवसानिमित्त खाऊच्या पैशातून केले उंब्रज येथील  प्राथमिक  आरोग्य केंद्रात फळांचे वाटप

ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेणे गरजेचे डॉक्टर संजय कुंभार यांचे प्रतिपादन

कुलदीप मोहिते -कराडउंब्रज साई मेडिकल फाउंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट (ेउंब्रज) नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते  मग ते कोरोना महामारी मध्ये मास्क सॅनिटायझर चे वाटप असो गरजूंना अन्नधान्य वाटप  बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे असो रक्तदान शिबिरे ,आरोग्य शिबिरे असो अशा विविध सामाजिक माध्यमातून साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट आपला ठसा उमटवत आलेला आहे यावेळी साई मेडिकल फाउंडेशन & चॅरिटेबल  ट्रस्ट चे अध्यक्ष शैलेश दादा  मोहिते यांची कन्या  साईशा शैलेश मोहिते हिच्या 11 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अगदी साधेपणाने उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना योद्धाना  व लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या उंब्रज मधील जेष्ठ नागरिकांना   फळांचे वाटप करून अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा  करण्यात आला कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  साई मेडिकल फाउंडेशन & चॅरिटेबल  ट्रस्टचे  संस्थापक-अध्यक्ष  शैलेश दादा  मोहिते यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कुंभार होते साईशा च्या  या उपक्रमाचे डॉक्टर संजय कुंभार यांनी  विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस  शुभेच्छाही दिल्या यावेळी बोलताना डॉक्टर संजय कुंभार यांनी कोरोना महामारी मध्ये प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केले तसेच समाजामध्ये कोरोना लसी बद्दल विविध गैरसमज आहेत या गैरसमजांना बळी न पडता प्रत्येक नागरिकांनी लस घेतली पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले, एक मार्च पासून कोरोना लसीकरणाची मोहीम उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये सुरु झाली असून जवळ जवळ दीड हजार ज्येष्ठ  नागरिकांनी लस घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र व कौन्सिलींग सेंटरच्या अध्यक्षा अश्लेषा मोहिते, सुनिल पवार , अर्पिता संकपाळ,प्रतिक्षा यादव,वेदांत मोहिते, अथर्व अलटकर उंब्रज  पोलिस स्टेशनचे कर्मचारी ,उंब्रज मधील जेष्ठ नागरिक तसेच   प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज चे कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment