आमदार शशिकांत शिंदे यांची पुसेगाव येथील असलेल्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटरला भेट, सर्व उपाययोजनाचा घेतला आढावा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 20, 2021

आमदार शशिकांत शिंदे यांची पुसेगाव येथील असलेल्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटरला भेट, सर्व उपाययोजनाचा घेतला आढावा

 आमदार शशिकांत शिंदे यांची पुसेगाव येथील असलेल्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटरला भेट, सर्व उपाययोजनाचा घेतला आढावा

प्रतीक मिसाळ- कोरेगाव  आज पुसेगाव येथील डेडिकेट कोव्हिडं सेंटर ला भेट देऊन उपाय योजनांची माहिती घेऊन संबंधित अधिकारी यांना  सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केल्या . येथील अडचणी समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला . महावितरण विभागाशी संपर्क साधून विद्युत पुरवठा संदर्भातील अडचणी दूर केल्या . तसेच जनरेटर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले . या सेंटर साठी लागणारी औषधे व इतर आरोग्य यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे . अंगापूर , क्षेत्र माहुली व वडूथ येथे उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड सेंटरसाठी व उभारलेल्या पुसेगाव डिसीसी साठी नुकताच ५० लाख निधी मंजूर करून देण्यात आला आहे . हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या . येथे लागणाऱ्या आरोग्य सुविधा व यंत्रणा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी आ . शशिकांत शिंदे यांनी दिली . कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे . त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे रोज कोरेगाव , सातारा , खटाव भागातील आरोग्य सुविधेकडे लक्ष ठेऊन आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना देत आहेत . या पार्श्वभूमीवर डेडिकेटेड कोव्हीड सेंटर तातडीने उभारण्यात यावीत यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न करून हे सेंटर आता सर्व सोयी सुविधा सहित येथे उभे राहत आहेत . कोरोना काळात लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आमदार शशिकांत शिंदे झटत आहेत . लोकांची हॉस्पिटलची वाढीव बिले , औषध पुरवठा , इतर सामुग्री पुरविण्याचे काम आमदार शशिकांत शिंदे साहेब करत आहेत . चारही कोव्हीड सेंटर व कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातकोणत्याही औषधांची , आरोग्य यंत्रणांची कमी भासू देणार नाही असे यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले .

No comments:

Post a Comment