शिवसेनेच्या वतीने आमदार खाडे यांना निवेदन
उमेश पाटील -सांगली
सदरच्या निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की केंद्र सरकारने नुकतेच संपूर्ण भारतभर 100 मल्टी सुपर स्पेशलिटी व सांसर्गिक रुग्णालय हॉस्पिटल उभे करणार असल्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने सदरच्या निवेदनातून मागणी करताना शिवसैनिकांनी सदरचे हॉस्पिटल सांगली-मिरज भागात तात्काळ मंजूर करावे त्यासाठी केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करावे असे आमदार खाडे यांच्याकडे शिवसैनिकांनी मागणी केली तसेच सदरच्या हॉस्पिटलच्या बेडची क्षमता 5000/- पाच हजार इतकी असावी तसेच 1000 बेड ऑक्सिजन बेड असावे व 1000 हजार बेडला व्हेंटिलेटर, ऑक्सीजन युक्त सुविधा असावी तसेच उर्वरित 4000/-चार हजार बेड हे विविध रुग्णाच्या विविध आजाराच्या उपचारासाठी बेड राखीव असावेत सदरचे मल्टी सुपरस्पेशालीटी सांसर्गिक रुग्णालये सांगली साठी तात्काळ मंजूर करावे अशी मागणी जनतेचे असल्याने ते मंजूर करावे तसेच शिवसैनिकांनी निवेदनातून पुढे असे सांगितले की तात्कालीन ब्रिटीश राजवटीमध्ये सांगली-मिरज परिसराचा अभ्यास करून हवामानाचा अभ्यास करून येथे रुग्ण बरे होण्यास खूप चांगले हवामान पोषक आहे त्या अनुषंगाने सांगली-मिरज परिसरात सदरचे केंद्रीय हॉस्पिटल मंजूर केल्यास परिसरातील 10 ते 12 जिल्ह्यांना व कर्नाटकातील काही जिल्ह्यांना सदरच्या केंद्रीय हॉस्पिटलचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे त्यामुळे तात्काळ सदरचे केंद्रीय हॉस्पिटल मंजूर करावे अशी शिवसैनिकांनी मागणी केली सदरचे मागणीचे निवेदन मुख्यमंत्री,प्रधानमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र आरोग्य मंत्री सांगली जिल्हा पालकमंत्री व विश्वजीत कदम साहेब यांना असे विविध मान्यवरांना निवेदन ची कॉपी पाठविण्यात आलेले आहे यावेळी उपस्थित अनिल शेटे, पंडितराव बोराडे, प्रसाद रिसवडे, जितेंद्र शहा, लक्ष्मण वडर, प्रकाश लवटे, सुशांत मधाळे सुरेश सपकाळ इत्यादी उपस्थित होते