दौडंच्या व्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा आणि विदेशी सिगारेट - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, April 24, 2021

दौडंच्या व्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा आणि विदेशी सिगारेट

 दौडंच्या व्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा आणि विदेशी सिगारेट

किशोर उकरंडे -पुणेदौंड पोलिसांनी शहरातील व्यापाराच्या गोदामात छापा टाकून बेकायदा चोरून गुटखा व विदेशी सिगारेट साठवण करून त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडील तब्बल 7 लाख रुपये किंमतीचा माल जप्‍त करुन कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश मुरली कृपलानी ( रा.दौंड भैरोबा मंदिर जवळ ) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांना माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून कारवाईसाठी तैनात केले‌. या पथकाने सोमवारी ( दि १९)

कमलेश कृपलानी हा आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गाळ्यामध्ये बेकायदा विनापरवाना गुटका व विदेशी सिगारेट असा माल साठवण करून त्याची आपल्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

या ठिकाणी छापा घातला असता तेथे तब्बल सात लाख रुपये किमतीचा गुटखा आणि सिगारेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कमलेश मुरली कृपलानी याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण) या कायद्यांतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हा फौजदार भगवान पालवे करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, विजय वाघमारे, अंमलदार शरद वारे, विशाल जावळे, किरण ढुके, जब्बार सय्यद, योगेश गोलांडे, आप्पा वाकळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment