वडगावशेरी येथे कोरोना चाचणी मोबाईल व्हॅनचे उदघाटन. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, April 24, 2021

वडगावशेरी येथे कोरोना चाचणी मोबाईल व्हॅनचे उदघाटन.

 वडगावशेरी येथे कोरोना चाचणी मोबाईल व्हॅनचे उदघाटन.

गजानन गायकवाड -पुणेपुणे शहरात कोरोनाच्या टेस्टिंगला गती देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने प्रसिध्द क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्या सौजन्याने टेस्टिंग व्हॅन सुरू करण्यात येत आहे. आज याचे उदघाटन माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याउपस्थितीत व संघाचे कार्यवाह माहेशजी करपे यांच्या हस्ते करण्यात आले.


कोरोना चाचणी व्हॅनमुळे सर्वांना कोरोना चाचणी करणे सोयीचे होईल. शिवाय अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मोफत चाचणी करून मिळेल. विशेष म्हणजे इथे पाच तासांत चाचणीचा अहवाल मिळेल. 

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि लसीकरण या त्रिसूत्रीचा वापर करण अत्यावश्यक आहे. शहरात उपचारांसाठी सज्जता वाढवताना टेस्टिंग आणि लसीकरणालाही गती देण्याचा शहर भाजपचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत सर्व प्रभागात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहे. वडगावशेरी भागात आज आणि उद्या पुण्य नगरी सोसायटी जवळील भाजी मंडई या जागी व्हॅन उपलब्ध असेल.या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, ही कळकळीची विनंती.प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व  महेश करपे, चांधारे, सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दिपक नागपुरे,दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदिप लोणकर, बापू मानकर, संदीप खर्डेकर, योगेश मुळीक, सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment