भक्ती रिसर्च सेंटरचा आदर्श शिक्षक पुरस्कार रवींद्रकुमार पवार यांना प्रदान
कुलदीप मोहिते सातारा
भक्ती रिसर्च सेंटर सातारा येथे कार्यात असून हे सेंटर विशेषतः ज्यांना संतती प्राप्तीत अडथळे येतात त्यांच्यावर शुद्ध आयुर्वेदिक उपचार करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे।
शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो।आशा ध्येयवादी, उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन केला जातो जेणेकरून त्यांना प्रेरणा देऊन अजून चांगल्या नवनिर्मित कामाची अपेक्षा व्यक्ती केली जाते।
हा उपक्रम या संस्थेकडून वर्षातील 365 दिवस सुरू असतो।
त्याचबरोबर समाजातील गरीब कुटुंबातील हुशार मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संपूर्ण शिक्षण मोफत केले जाते।
शिक्षकांचे दर्जेदार साहित्य उदा काव्यलेखन,कथालेखन कादंबरी इ पुस्तके संस्था स्वतः खरेदी करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी ती पुस्तके मोफत दिली जातात।
आज संस्थेने मदत केलेली एक दत्तक मुलगी आयर्लंड या देशात संशोधकांचे काम करीत आहे