सांगली बाजारपेठेत बंदला चांगला प्रतिसाद. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 27, 2021

सांगली बाजारपेठेत बंदला चांगला प्रतिसाद.

 सांगली बाजारपेठेत बंदला चांगला प्रतिसाद.

 सुधीर पाटील-सांगलीकोरोनाची साखळी तोडण्यासाठी  घोषित करण्यात आलेल्या संचारबंदीला सांगली बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने कडकडीत बंद आहेत. सांगली शहरातील  व्यापाऱ्यांनी  बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील सराफ कट्टा, कापड पेठ, हरभट रोड, स्टेशन रोड, टिंबर एरिया, वखारभाग, मार्केट यार्ड आदी प्रमुख ठिकाणी सकाळी अकरानंतर शुकशुकाट जाणवत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून  दुकानदारांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे. सांगली बरोबरच माधवनगर  बाजारापेठेतही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे.No comments:

Post a Comment