रेमडिसिव्हर चा साठा करणाऱ्यांवर राज्य सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा-आ शशिकांत शिंदे
प्रतिक मिसाळ -सातारा
देशात आणि महाराष्ट्रात मेलेल्या लोकांच्यावर राजकारण करणाऱ्या भाजपा प्रवृत्तीचा निषेध आम्ही करतो . ब्रुक फार्मा सारखी कंपनी एवढ्या भीषण परिस्थितीत रेमडिसिव्हर चा साठा ठेवत असेल , तो साठा एका पक्षाने मागितला त्यांना देण्याची तयारी करत असेल आणि सरकारने मागितले की साठा नाही असे दाखवत असेल तर एवढे दिवस रेमडिसिव्हर न मिळाल्याने जे राज्यात मृत्यू झाले आहेत त्याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो . अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण भाजपा करत असेल आणि केंद्राच्या धमक्या देऊन साठा वळविणारे महाराष्ट्रात मृत्यू झालेल्याला जबाबदार आहेत . महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडिसिव्हर इंजेक्शन ची गरज असताना जर कंपनी इंजेक्शन नाही असे सांगत असेल तर चौकशी करणाऱ्या पोलीस प्रशासनाला अडवणूक का केली जाते असा सवाल उपस्थित होतो . जर त्यात इंजेक्शन साठवून ठेवलेत असे निष्पन्न झाले आणि त्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे . त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे . कोणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारने साठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधात कारवाई करावी हा अधिकार सरकारकडे आहेत . विरोधी पक्षनेते आले म्हणून त्यांना सोडण्यापेक्षा त्या कंपनीने साठा ठेवल्याबद्दल रेमडिसिव्हर न मिळाल्याने ज्यांचे प्राण गेले आहेत त्याला जबाबदार पकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी . हा साठा कोणाच्या सांगण्यावरून राज्याला दिला गेला नाही याची सुद्धा माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी . कोणाच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे.संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा आहे .असे आ.शशिकांत शिंदे यांनी पत्रकार यांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
तसेच जेएनपीटी मध्ये निर्यातीसाठी अडकून पडलेला साठा सुद्धा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रासाठी वापरावा , जर कारवाई झाली तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल ही मला खात्री आहे .असेही यावेळी बोलताना आ.शिंदे यांनी नमूद केले.