सरस्वती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष निलेश नेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, April 18, 2021

सरस्वती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष निलेश नेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 सरस्वती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष निलेश नेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

किशोर उकरंडे- पुणे सरस्वती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खराडी येथील  ऍड रेगे यांच्या संतुलन भवनला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला

तसेच तेथील विद्यार्थ्यांची दोन वेळची जेवणाची व्यवस्था अन्न दान हेच श्रेष्ठ दान या तत्वावर करण्यात आली.

     यावेळी सरस्वती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सह चिटणीस  कृष्णा रामदास मोहिते, अंकुश तापकीर (विभाग अध्यक्ष भोसरी मनसे), स्टार महाराष्ट्रचे पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर, नातू  (कोविड सेंटर मुख्य प्रभारी), सुधीर पुरबे, अक्रम ताळीकोटी, विद्या पायके, मेघना भिसे, सखाराम दामोदर, सिद्धार्थ वंजारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment