Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आ . शिवेंद्रसिंहराजे ; परळी येथे कोरोना मदत केंद्राचे उदघाटन

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आ . शिवेंद्रसिंहराजे ; परळी येथे कोरोना मदत केंद्राचे उदघाटन

 प्रतीक मिसाळ -सातारा 



- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन धोक्यात आले आहे . कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत त्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे . आपला देश कोरोनमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे . कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी , असे आवाहन आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले . परळी ता . सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वयंम सामाजिक संस्था सातारा आणि सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ . सरिता इंदलकर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या कोरोना मदत केंद्राच्या ( सातारा शहर व तालुका मर्यादित ) उदघाटनप्रसंगी आ . शिवेंद्रसिंहराजे बोलत होते . 



यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले , पंचायत समितीच्या सभापती सौ . सरिता इंदलकर , उपसभापती अरविंद जाधव , सदस्य सौ . विद्या देवरे , स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज विभुते , कांबळे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . पवार , सरपंच निकम , परळी आरोग्य केंद्राचे डॉ . यादव , सर्व कर्मचारी उपस्थित होते . या कोरोना मदत केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना कोरोना आजाराबद्दल माहिती देणे , कोरोना तपासणीबद्दलचे गैरसमज दूर करणे , बाधित रुग्ण व कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करणे , लसीकरणाबद्दल माहिती देणे व जनजागृती करणे , भागात बेडची उपलब्धता जाणून घेणे आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे . कोरोना मदत केंद्रामुळे ग्रामस्थांना कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शन तर होईलच पण , बाधित रुग्णांनाही याचा निश्चित फायदा होईल . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे . कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने घरातच थांबणे आवश्यक आहे . विनाकारण बाहेर न फिरणे , गर्दी न करणे , मास्क वापरणे आणिवारंवार हात धुणे , सॅनिटायझरचा वापर करणे याचे काटेकोर पालन झाल्यास आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकतो . त्यामुळे प्रत्येकाने या बाबींचे पालन करून स्वतःचे आणि कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करावे , असे आवाहन आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले .



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies