"चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 'बीजेपी पुणे फाईट्स कोविड' या डॅशबोर्डचे झालं अनावरण" - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

"चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 'बीजेपी पुणे फाईट्स कोविड' या डॅशबोर्डचे झालं अनावरण"

"चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 'बीजेपी पुणे फाईट्स कोविड' या डॅशबोर्डचे झालं अनावरण"

गजानन गायकवाड- पुणेकोरोना महामारीचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी गेल्या वर्षभराच्या काळापासून अथक मदतकार्य सुरू आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता आरोग्यसेवा, मदतकार्य, आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रश्नांवर विविध पातळीवर काम करत आहे. याच अनुषंगाने पुणे शहरातील कोरोना महामारीच्या संपूर्ण माहितीसाठी भारतीय जनता पक्षाने एक डॅशबोर्ड सुरू केला असून त्या माध्यमातून आपण कोरोनाबद्दलची सर्व माहिती एकत्रितरीत्या पाहू शकणार आहोत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते 'बीजेपी पुणे फाईट्स कोविड' या डॅशबोर्डचे आज अनावरण करण्यात आले.

कोरोना संदर्भात खूप काही घडत असलेल्या सकारात्मक गोष्टी सुद्धा पुणेकरांपर्यंत या माध्यमातून पोहोचवता येणार आहेत.कोरोनाची माहिती एकत्रितपणे आकडेवारीसह उपलब्ध करून देऊन त्यानुसार पुढील उपाययोजना करण्यासाठी हा डॅशबोर्ड उपयुक्त ठरणार आहे. 

www.bjppunefightscovid.in

या संकेतस्थळावर जाऊन आपण कोरोनाबद्दल माहिती घेऊ शकतो.या अनावरण कार्यक्रमास शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष,दीपक पोटे, राजेश येनपुरे,दीपक नागपुरे,संदीप लोणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment