बोर्लीपंचतनमध्ये नव्यानियमावलीत बाजारपेठ कडकडीत बंद
कोरोनाच संभाव्य धोका टाळण्यासाठी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त
श्रीवर्धनमध्ये नवीन नियमावलीसाठी प्रशासन सज्ज
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
राज्य सरकारने नवीन नियमावलीने कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आता ग्रामीण भागातून ही दक्षता घेण्यात येत आहे. सकाळी ७ नंतर चार तासांनी पूर्णता टाळेबंदीला श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात नागरिक, व्यापाऱ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पंचक्रोशीतील प्रसिद्ध बोर्लीपंचतन शहरातील दुकाने बंद दिसून आली. यावेळी पूर्णपणे बाजारपेठ बंद करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावले आहेत. परंतु, जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जनतेतून मात्र, याचे गांभीर्य घेतले जात नसल्याने श्रीवर्धन प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्या व अनावश्यक फिरणार्याला कारवाईला सामोरे जावे लागेल अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नवीन नियमावलीचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे. असे आव्हान यावेळी करण्यात येत आहे.
आज श्रीवर्धन (ता.२१) तालुक्यात नव्याने आठ नवीन रूग्णाची भर पडली असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. यातील श्रीवर्धन शहर २, बोर्लीपंचतन २, वडवली २ तर कुडकी व सायगाव मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब पाहत यापूर्वीच्या पहिल्या लाटेत एकाच वेळी सर्व गावांत रुग्ण अपवादानेच सापडत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत रोज प्रत्येक गावात रुग्ण सापडत आहेत. ही बाब गंभीर होत असताना श्रीवर्धन प्रशासनाने सतर्कता घेत नवीन नियमावलीत कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावर बिनामास्क फिरण्याचे प्रमाण कमी आले आहे. बाजारपेठेत नेहमी प्रमाणे होणारी गर्दी आटोक्यात आहे. हीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात कोरोना पासून ब्रेक द चेन मिशन मध्ये श्रीवर्धनकरांना नक्की यश मिळेल.
खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय-
सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय आहे. रुग्ण सापडलेल्या गावांतील जनतेने स्वतःहून तपासणी करून घ्यावी. कोरोनाची ही दूसरी लाट असून पुढील काही महीने अत्यंत महत्वाचे आहे. खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय असल्याचे प्रशासन मोठ्या पोटतिडकीने सांगत आहे.